शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बाल साहित्य संमेलन बा-बापूनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

विद्यार्थ्यांच्या संगीत व नृत्य सादरीकरणाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी बालकांसाठी लेखन, वाचन व सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. सुनीता कावळे, हरीश इथापे, सचिन सावरकर, मोहित सहारे यांचा सत्कारही करण्यात येईल. उद्घाटनानंतर दुपारी १२.३० वाजता चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत सना पंडित यांच्यासह खुशी गोमासे व आयुषी ठाकरे या विद्यार्थिनी घेणार आहेत.

ठळक मुद्देविदर्भ साहित्य संघ व स्कूल ऑफ स्कॉलर्सचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ शाखा आणि स्कूल आॅफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या बाल साहित्य संमेलनाची सुरुवात गुरुवार १२ रोजी होते आहे. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या बाल साहित्य संमेलनासाठी बा-बापूनगरी सज्ज झाली आहे.गुरुवारी उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता लोक विद्यालयातून ग्रंथदिंडी निघणार असून पालखीत भारताचे संविधान आणि सत्याचे प्रयोग हे ग्रंथ राहणार आहेत. विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग असणाऱ्या या दिंडीची सांगता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पणाने होईल. संमेलनाचे उद्घाटन सावंगी येथे सकाळी ११ वाजता चिन्मय मांडलेकर यांच्या हस्ते होईल. यावेळी, संमेलनाध्यक्ष चंद्रकांत चन्ने, प्रमुख अतिथी माजी खासदार दत्ता मेघे, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले, स्वागताध्यक्ष आभा मेघे, संमेलन संयोजक संजय इंगळे तिगावकर, निमंत्रक शुभदा फडणवीस, केद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्वय सचिव प्रदीप दाते तसेच आयोजन व स्वागत समितीचे सदस्य उपस्थित राहतील.विद्यार्थ्यांच्या संगीत व नृत्य सादरीकरणाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी बालकांसाठी लेखन, वाचन व सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. सुनीता कावळे, हरीश इथापे, सचिन सावरकर, मोहित सहारे यांचा सत्कारही करण्यात येईल. उद्घाटनानंतर दुपारी १२.३० वाजता चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत सना पंडित यांच्यासह खुशी गोमासे व आयुषी ठाकरे या विद्यार्थिनी घेणार आहेत. दुपारी २ वाजता प्रेमानंद गज्वी लिखित व नितप्रिया प्रलय दिग्दर्शित ‘हे राम’ ही महात्मा गांधी यांच्या जीवनावरील एकांकिका स्कूल आॅफ स्कॉलर्सचे विद्यार्थी सादर करतील.शुक्रवारला महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित कथाकवितांचे सादरीकरण होईल. यात सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांचे कविसंमेलन तर ११.३० वाजता ‘बापूंच्या गोड गोष्टी’ हा कथावाचनाचा कार्यक्रम होईल. दुपारी २ वाजता अभिरूप न्यायालय आयोजित असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आपली बाजू मांडणार आहेत.या कार्यक्रमात न्यायधीशाच्या भूमिकेतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीती देव न्यायनिवाडा करतील. संमेलनाचा समारोप व खुले अधिवेशन दुपारी ३.३० वाजता होणार असून संमेलनाध्यक्ष चंद्रकांत चन्ने, प्रमुख अतिथी दत्ता मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, बालसाहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त सलीम सरदार मुल्ला, बाल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभदा खिरवडकर यांची उपस्थिती राहणार आहे. संमेलनस्थळाला बा-बापू साहित्यनगरी असे नाव देण्यात आले असून या परिसरातील ग्रंथदालनात बालकुमार साहित्य, गांधीसाहित्य, विज्ञानखेळणी, छायाचित्रप्रदर्शनी, चित्रकला व हस्तकला, खाद्यपदार्थ आदींचे वैविध्यपूर्ण दालने राहणार आहेत. त्यामुळे बालकांसह पालकांनी या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.संमेलनाध्यक्ष चन्ने, उद्घाटक मांडलेकरसावंगी येथील बा-बापू साहित्य नगरीत आयोजित विदर्भस्तरीय सहाव्या बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बसोली ग्रुपचे संचालक, ख्यातनाम चित्रकार चंद्रकांत चन्ने राहणार असून प्रसिद्ध सिनेनाट्यकलावंत चिन्मय मांडलेकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दोन दिवसीय या संमेलनामध्ये बालकांचे तारांगणच या साहित्यनगरीत अवतरणार आहेत.