बालहक्क संरक्षण रॅली
By Admin | Updated: December 27, 2015 02:36 IST2015-12-27T02:36:53+5:302015-12-27T02:36:53+5:30
बालकांचे लैंगिक व इतरही प्रकारे होणारे शोषण थांबून बालकांना संरक्षण मिळावे याकरिता चाईल्ड लाईन १०९८ या फोन सेवेच्या जाणीव जागृती करिता

बालहक्क संरक्षण रॅली
चाईल्ड लाईन वर्धा : १०९८ क्रमांकासाठी जाणीवजागृती
हिंगणघाट : बालकांचे लैंगिक व इतरही प्रकारे होणारे शोषण थांबून बालकांना संरक्षण मिळावे याकरिता चाईल्ड लाईन १०९८ या फोन सेवेच्या जाणीव जागृती करिता व समाजात बाल हक्क संरक्षणाचे वातावरण निर्माण व्हावे, याकरिता विद्यार्थ्यांनी हिंगणघाट शहरामध्ये बाल हक्क सरंक्षण रॅली काढण्यात आली.
कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशन अंतर्गत डिझाईन फॉर चेंच प्रकल्पाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. महेश ज्ञानपीठ हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला चाइल्ड लाईन वर्धाचे संचालक गिरधर राठी, महेश ज्ञानपीठ हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सचे संचालक गिरधर राठी, ठाणेदार एस.एम. बोडखे, जावेद रिजवी, राहुल बोरकुटे, आशिष मोडके आदी उपस्थित होते.
कन्नाके यावेळी म्हणाले, दिवसेंदिवस वाढणाऱ्या लैंगिक शोषणाला लढा देण्याकरिता सर्वांना एकत्र येणे व बाल संरक्षणाच्या वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाही आधी बलहक्कासाठी जनजागृती करण्याची गरजे त्यांनी व्यक्त केली.
मंचावर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरूवात केली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून बाल सरंक्षणाचा संदेश दिला. तसेच लोकांपर्यंत संदेश पोहोचविण्याकरिता पत्रकेही वाटली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीने हिंगणघाट शहर दुमदुमून गेले होते. कार्यक्रमाचे संचालन सौरभ वंजारी यांनी केले. आभार नितेश धानोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या व रॅलीच्या यशस्वीतेकरिता प्राचार्य वैशाली पॉल, व शिक्षक कर्मचारी वृंद, प्राचार्य रेणू चौधरी, दिवाकर वनकर व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)