बालकामगार विरोधी चळवळ राबवा
By Admin | Updated: June 24, 2015 02:23 IST2015-06-24T02:23:27+5:302015-06-24T02:23:27+5:30
बालकामगार, बालमजूरी ही समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. याकरिता कार्य करावे, असे आवाहन आमदार अमर काळे यांनी केले.

बालकामगार विरोधी चळवळ राबवा
अमर काळे : लायन्स मेळाव्यात सत्कार
वर्धा : बालकामगार, बालमजूरी ही समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. याकरिता कार्य करावे, असे आवाहन आमदार अमर काळे यांनी केले. यावेळी त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. बोरगाव (मेघे) येथे लॉयनेस व लिओ क्लब वर्धाचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाला इंस्टॉलिग आॅफीसर राजे मुधोजी भोसले, आ. डॉ. पंकज भोयर, डॉ. विनोद अदलखीया, प्रतिभा अदलखीया, अजय वाणे, प्रशांत पांडे यांची उपस्थिती होती.
यानंतर रिजन चेअरपर्सन वाणे यांनी लॉयन्स, लॉयनेस, लिओ क्लबमध्ये समाविष्ट सर्व सदस्यांना शपथ दिली. २०१५-१६ साठी लॉयन्स क्लब अध्यक्षपदी अभिषेक बेद, अनुराग पोद्दार, कोषाध्यक्ष जयेश चव्हाण यांना तर नौशाद बक्श, वरूण फत्तेपुरीया, निखिल रोकडे, विश्वास बांभूरकर, डॉ. माधुरी वाणी, अमित भुरे, विनय कुबडे, पराग मुरारका, मोहन जुमडे, अक्षय बेद, वरुन पांडे, रितुराज चुडीवाले, नारायण अडवाणी, डॉ. शशांक बानाईत, डॉ. सारंग गोडे, सुनिल देशमुख, अक्षय गळगटे, आदील हुसैन, स्मिता बढीये, शुभदा रुद्रकार, चंद्रशेखर इंगोले, गिरीष उपाध्याय, प्रकाश कटारिया, प्रदीप दाते, राजेश श्रावणे, रंजना दाते, महेश भाटीया, पी.पी. देशमुख, अभिजीत श्रावणे यांचा समावेश आहे. लॉयनेस क्लब अध्यक्षपदी आस्था बेद, योगीता मानकर, विजया अड्याळकर, सोनाली श्रावणे, भावना वाढीभस्मे, निलिमा बोंगीरवार, फरिदा सैफी, रिया चौधरी, वनमाला चौधरी, शुभदा मशानकर, पूजा रोकडे, प्रीती पोद्दार, अल्का भुगुल, शिल्पा फत्तेपुरीया, प्रतिभा वाल्के, प्रतिभा ठाकुर, डॉ. वंदना ईखार यांचा समावेश आहे.
लिओ क्लबच्या नितिन घोडे, सुमित झाडे, वैभव भगत यांना शपथ दिली. याप्रसंगी ओंकार धावडे यांना सहकार भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. संचालन प्रकाश कटारीया व डॉ. रश्मी गोडे यांनी केले तर आभार अनुराग पोद्दार यांनी मानले. यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)