शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

चाईल्ड हेल्पलाईन नंबर आता शालेय पुस्तकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:47 AM

बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाणार आहे.

ठळक मुद्देएनसीईआरटीचा पुढाकार बाल लैंगिक शोषणाबाबत जागृतीचा मुद्दा

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाणार आहे.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्राने (एनसीईआरटी) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सत्रापासून (२०१८) तिसरीच्या इव्हीएस-एनव्हायरन्मेंटल सायन्स पुस्तकात आणि यानंतर पहिली ते पाचवीच्या भाषा व गणित तसेच चवथी आणि पाचवीच्या पर्यावरणशास्त्र या पुस्तकात समाविष्ट करणार आहे.बाल लैंगिक शोषणाबाबत शालेय विद्यार्थी व शिक्षकांत जागृती व्हावी म्हणून शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल सुचविणारा २५ पानांचा अहवाल डॉ. खांडेकर, अनघा इंगळे, सावित्री, गिरीशा, मोहम्मद कादीर, अन्विता, प्रीती, डॉली, अनुरथी, सुमेध, निखिल व श्रीनिधी दातार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर व एनसीईआरटीला डिसेंबर २०१६ मध्ये पाठविला होता. यावर आतापर्यंत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आरटीआय अंतर्गत केली होती. यावर एनसीईआरटी शैक्षणिक विभागाच्या डीन प्रा. सरोज यादव यांनी १४ जून रोजी प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर यांना दिली.

काय आहे चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८१०९८ हा टोल फ्री टेलि-हेल्पलाईन नंबर चाईल्ड हेल्पलाईन नंबर म्हणून चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने १९९६ मध्ये तयार केला होता. संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ही भारतातील एकमेव व सर्वांत व्यापक अशी २४ तास चालू असणारी फोन सेवा आहे. ही सेवा देशातील ३६६ शहरांत, जिल्ह्यांत तसेच ३४ राज्यात कार्यरत आहे. राज्याच्या शालेय विभागानेही यावर सकारात्मक विचार करावा म्हणून डॉ. खांडेकर राज्य शासनाशी पत्रव्यवहार करीत आहेत.

एनसीईआरटीचे हे पाऊल शाळा व इतर शैक्षणिक केंद्रांना सुरक्षित जागा बनविण्यास मदत करेल. यामुळे मुलांना स्वत:ची सुरक्षा तसेच तक्रार करण्याच्या माध्यमाची माहिती होईल. घटना घडल्यास योग्य ठिकाणी मदत घेण्याची शक्ती विद्यार्थी, शिक्षक व पालकांत निर्माण होईल. मुलांची शालेय पुस्तके विद्यार्थी, शिक्षकांसह पालकही वाचत असतात. यामुळे एनसीईआरटीचे हे पाऊल बाल लैंगिक शोषण कमी करण्यात मैलाचा दगड ठरणार आहे. यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यकशास्त्र, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र