मुख्यमंत्री आज आर्वीत
By Admin | Updated: May 5, 2017 01:56 IST2017-05-05T01:56:37+5:302017-05-05T01:56:37+5:30
आर्वी तालुक्यातील सावंगी (पोळ) येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार आणि वॉटर कप

मुख्यमंत्री आज आर्वीत
वर्धा : आर्वी तालुक्यातील सावंगी (पोळ) येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार आणि वॉटर कप स्पर्धेत करण्यात आलेल्या कामांची पाहणी करणार आहेत. शिवाय याच वेळी ते पांदण रस्त्याचीही पाहणी करणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनीही कंबर कसली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी १२ वाजताच्या सुमारास आर्वी तालुक्यातील सावंगी (पोळ) येथे तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर उतरणार आहेत. ते पाणी फाऊंडेशन अंतर्गत जलयुक्त शिवार, पालकमंत्री पांदण रस्त्यांची पाहणी करून आर्वी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी ते विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची चर्चा करीत अनेक विषयांचा आढावा घेतील. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. सुरक्षेसाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, ३८ पोलीस अधिकारी तसेच ३०८ पोलीस कर्मचाऱ्यांच्या तगड्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)