लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानातून घेण्यात आलेल्या धान्यात चक्क रासायनिक खत आढळल्याने एकच खळबळ उडली होती. या घटनेची माहिती मिळताच पुरवठा विभागाच्या चमूने पराग कातरकर यांच्या मालकीच्या स्वस्त धान्य दुकान गाठून चौकशी केली.प्राप्त माहितीनुसार, पराग कातरकर यांच्या मालकीच्या स्वस्त धान्य दुकानातून देवराव डाहाके यांनी धान्य खरेदी केले. त्यानंतर त्यांनी सदर धान्य घरी नेत बारकाईने पाहले असता तांदळात डी.ए.पी. खत आढळून आले. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याने डाहाके यांनी सदर प्रकाराची माहिती ग्रा.पं. सदस्य सचिन पारसडे यांना दिली.दरम्यान सदर धक्कादायक प्रकाराची माहिती हिंगणघाटच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे सुहास टोंग यांनी तातडीने अल्लीपूर गाठून पराग कातरकर यांच्या दुकानाची पाहणी केली. शिवाय तांदळात रासायनिक खत कसे आले याची चौकशी केली.बारकाईने पाहणी केली असता त्यांनाही तांदळात रासायनिक खत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रासायनिक खत समाविष्ट असलेले तांदळाचे नमूने घेत ते संबंधित कार्यालयास पाठविले आहे. सदर प्रकरणी पुढे काय होते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पराग कातकर यांच्या मालकीचे अल्लीपूर येथील स्वस्त धान्य दुकान गाठून पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान तांदळाच्या एका ५० किलोच्या पोत्यात तांदळासोबत रासायनिक खत असल्याचेही निदर्शनास आले आहे. खत मिश्रीत तांदळाचे नमूने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. शिवाय वरिष्ठांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.- सुहास टोंग, अन्न पुरवठा अधिकारी, हिंगणघाट.मला सीलबंंद तांदळाचे पोते मिळाली. ती थेट अल्लीपुरात आणण्यात आली. शिवाय नागरिकांना आपण त्या तांदळाचा स्वस्त धान्य दुकानातून वाटप केला आहे. असे असले तरी मला त्यात रासायनिक खत असल्याचे निदर्शनास आले नाही. तांदळात रासायनिक खत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ग्राहकाकडून ते धान्य परत घेतले. स्वस्त धान्य दूकानातून वितरित करणाºया धान्यात खत आढळणे हे चुकीचे आहे.- पराग कातरकर, स्वस्त धान्य दुकानदार, अल्लीपूर.
शासकीय धान्यात आढळले रासायनिक खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST
प्राप्त माहितीनुसार, पराग कातरकर यांच्या मालकीच्या स्वस्त धान्य दुकानातून देवराव डाहाके यांनी धान्य खरेदी केले. त्यानंतर त्यांनी सदर धान्य घरी नेत बारकाईने पाहले असता तांदळात डी.ए.पी. खत आढळून आले. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा असल्याने डाहाके यांनी सदर प्रकाराची माहिती ग्रा.पं. सदस्य सचिन पारसडे यांना दिली.
शासकीय धान्यात आढळले रासायनिक खत
ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानातील प्रकार : पुरवठा अधिकाऱ्यांकडून चौकशी