शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उगवण क्षमता तपासून सोयाबीन बियाण्यांची लागवड केल्यास फसवणुकीला लागेल ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उभ्या पिकाची चांगली निगा घेतल्याने, पीकही बऱ्यापैकी बहरले, परंतु ऐन कापणीच्या वेळी जिल्ह्यात सततचा पाऊस झाला. यामुळे उभ्या सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला. हेच सोयाबीन अनेक शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे, तर मध्य प्रदेशातील सोयाबीन बियाणे विदर्भात दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता  आहे.

ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सोयाबीन उत्पादकांना सल्ला : १.२३ लाख हेक्टरवर लागवडीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील वर्षी सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उभ्या सोयाबीन पिकावर विपरित परिणाम झाले. यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी बियाणे खरेदीसाठी तयारी करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. त्यानंतरच सदर बियाण्यांची शेतात लागवड करावी. असे केल्यास यंदाच्या कोविड संकटात फसवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लागेल, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उभ्या पिकाची चांगली निगा घेतल्याने, पीकही बऱ्यापैकी बहरले, परंतु ऐन कापणीच्या वेळी जिल्ह्यात सततचा पाऊस झाला. यामुळे उभ्या सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला. हेच सोयाबीन अनेक शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे, तर मध्य प्रदेशातील सोयाबीन बियाणे विदर्भात दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कृषी केंद्रातून बियाणे खरेदी केल्याचे बिल घेत सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत खरेदी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता चांगली असल्याचे लक्षात आल्यावरच त्या बियाण्याची लागवड करावी. उगवण क्षमता कमी असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने, बियाणे खरेदी केलेल्या देयकाची झेरॉक्स सलग्न करून थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी. तक्रारीची वेळी दखल घेत बियाणे विक्रेता कंपनीवर कृषी विभागाकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. 

तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉट्सॲप’वर थेट करता येणार लेखी तक्रारnउगवण क्षमता कमी असलेल्या बियाण्याबाबतची तक्रार शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर करता येणार आहे. तालुका कृषी अधिकारी ही तक्रार तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी वळती करणार आहे.

अधिकाऱ्यांच्या समक्ष तपासावी उगवण क्षमता- सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर शेतकऱ्यांनी सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. याप्रसंगी कृषी सहायक उपस्थित राहिल्यास योग्य पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता तपासता येणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी करणार चैाकशीअंती जबाबदारी निश्चित- एखाद्या कंपनीच्या बियाण्यांची उगवण क्षमता अतिशय कमी असल्याचे लक्षात येताच प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर करून दोषी बियाणे कंपनीवर जबाबदारी निश्चित करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

फसणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता चांगली असल्यावरच सदर बियाण्याची लागवड करावी, तर उगवण क्षमता कमी असल्यास तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी. तक्रारीची वेळीच दखल घेत कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :agricultureशेती