परिट (धोबी) सेवा मंडळाचे कपडे धुणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 01:20 IST2016-09-20T01:20:24+5:302016-09-20T01:20:24+5:30
अनेक दिवसांपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ आरक्षण समितीच्यावतीने

परिट (धोबी) सेवा मंडळाचे कपडे धुणे आंदोलन
वर्धा : अनेक दिवसांपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेकरिता राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ आरक्षण समितीच्यावतीने निवेदन देणे सुरू आहे. या निवेदनांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाविरोधी निदर्शने करीत मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, धोबी समाज पुनर्विलोकन समितीचा (डॉ. भांडे समिती) अहवाल शिफारशीसह केंद्र शासनाला पाठवावा आणि सोबत जोडलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन समितीचा अहवाल रद्द करण्याची प्रमूख मागणी करण्यात आली. लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या धोबी समाज बांधवांना वीज आणि कोळशाच्या दरात सवलत द्यावी. संत गाडगेबाबांच्या कर्मभूमीत राष्ट्रीय स्मरकाकरिता शासनाने निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.