शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Hinganghat Case : हिंगणघाट जळीत प्रकरणी दोन आठवड्यांत आरोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 03:01 IST

Hinganghat Case : हिंगणघाट येथील महिला प्राध्यापिकेच्या जळीत प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे.

हिंगणघाट (वर्धा) : हिंगणघाट येथील महिला प्राध्यापिकेच्या जळीत प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. येत्या दोन आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

हिंगणघाट शहरात सोमवारी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या प्राध्यापिकेवर विकेश नगराळे या माथेफिरूने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीला अटक केली. सध्या आरोपीला वर्धा जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यात ठेवण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ ते २० लोकांचे बयाण नोंदविले आहे. या प्रकरणात आरोपीने वापरलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

शासनाकडून ११ लाख

पीडित तरुणीवर नागपूर येथील आॅरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शासनाने मुंबईतील बर्न इन्स्टिट्यूूटमधील डॉक्टरांची एक टीमसुद्धा पाठविली आहे. जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी उपचारासाठी शासनाकडून मदत मिळविण्यासाठी हालचाली केल्या. त्यानंतर शासनाकडून ४ लाख रुपये रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा झाले असून आणखी ११ लाख रुपये मंजूर केले आहेत.पाच दिवसांनंतरही जिल्ह्यात या प्रकरणाची धग कायम आहे. शुक्रवारी आर्वी, पुलगाव आणि सेलू येथे मोर्चे काढण्यात आले. पीडित व आरोपी राहात असलेल्या गावात शुक्रवारी हिंगणघाट पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेतली.

उज्ज्वल निकम बाजू मांडणार

हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीची बाजू न्यायालयात सुप्रसिद्ध विधिज्ञ ऊज्ज्वल निकम मांडणार आहेत. पीडितेच्या वतीने अ‍ॅड. निकम यांनी खटला चालवावा, अशी मागणी तिच्या आईने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेली होती.

स्वत: देशमुख यांनीच निकम यांना ही माहिती दिली व पिडितेच्या वतीने न्यायालयात आपण बाजू मांडावी, अशी विनंती केली. अ‍ॅड. निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की देशमुख यांची विनंती आपण मान्य केली आहे. आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी युक्तिवाद करू.नागपुरातील अ‍ॅड. सत्यनाथन यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती जवळपास निश्चित होती. सत्यनाथन यांनीही दुजोरा दिला होता. परंतु निकम यांची नियुक्ती झाली.

दशकाच्या मैत्रीत झाला घात

पोलिसांनी केलेल्या तपासानंतर बरीच नवीन माहिती पुढे आली आहे. पीडित तरूणी व आरोपी एकाच गावचे आहेत. आरोपी हा तरुणीपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी हे दोघेही हिंगणघाटला सहप्रवासी होते. एकाच गावातून दररोज बसने ये-जा असल्याने दशकापासून त्यांची मैत्री होती. उच्च शिक्षणासाठी पीडिता वर्ध्याला गेल्यावर या मैत्रीत खंड पडला.यादरम्यान विकेशचे लग्न झाले.

शिक्षण आटोपून पीडिता हिंगणघाट येथील एका खासगी महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकविण्यासाठी रूजू झाली. या दरम्यान आरोपी विकेशने मैत्री कायम ठेवण्यासाठी पीडितेकडे आग्रह धरला होता. तीन महिन्यांपूर्वी पीडितेच्या पित्याने विकेशला समजविण्याचा प्रयत्न केला. यावरून तो चिडला होता. माझ्याशी व्यवस्थित वागत असताना वडिलांना माहिती का दिली यावरून विकेश चिडला होता. तेव्हापासूनच तो सूड घेण्याच्या मनस्थितीत होता.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटPoliceपोलिसUjjwal Nikamउज्ज्वल निकमmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtraमहाराष्ट्र