शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video : मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला 'पन्नास खोके अन् वेगळ्या विदर्भा’ची सलामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 14:11 IST

अ. भा. मराठी साहित्य संमेलन : निदर्शकांना आवरण्यासाठी पोलिसांची दमछाक

गजानन चोपडे

वर्धा : दोन तास पन्नास मिनिटे चाललेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच ‘पन्नास खोके, एकदम ओके... आणि विदर्भातील ५० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण, असा सवाल करीत काहींनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सम्मेलनस्थळी एकच गोंधळ उडाला. घोषणाबाजी करणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. अचानक उडालेला गोंधळ बघून मंचावरील मान्यवर मंडळीदेखील अवाक् झाली. यावेळी विदर्भवाद्यांनीदेखील यात उडी घेऊन सभामंडप दणाणून सोडला.

महात्मा गांधी साहित्य नगरीतील आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे उद्घाटनपर भाषण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली. हे साहित्यिकांचे व्यासपीठ असून, येथे राजकीय चर्चा नको, असे आवर्जून सांगणारे मुख्यमंत्रीच जेव्हा खुद्द समृद्धी महामार्गाचे महिमामंडन करू लागले. तेव्हा अचानक रसिकश्रोत्यांमध्ये बसलेल्या विरोधकांनी घोषणेचे हत्यार उपसले. 'पन्नास खोके, एकदम ओके...' अशी घोषणा देताच सभामंडपात गोंधळ उडाला. 

ही घोषणा ऐकून मुख्यमंत्री स्तब्ध झाले. 'हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांचेही प्रश्न आपण ऐकून घेऊ', असे मंचावरून सांगत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. त्यानंतर महिला निदर्शकांनी विदर्भातील ५० हजार शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण आणि नंतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा दिल्या. अचानक झालेला हा प्रकार बघून मान्यवरांच्या भाषणात रमलेले पोलिस अलर्ट मोडवर आले. आंदोलकांना ताब्यात घेऊन सभामंडपातून बाहेर काढत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या गोंधळानंतर मात्र हळूहळू सभामंडपातील खुर्च्या रित्या होऊ लागल्या. शिवाय कुणालाही अपेक्षित नसलेल्या या प्रकाराची साहित्यनगरीत दिवसभर चर्चा रंगली होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ