लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. परंतु, पोलीस येत असल्याची चुणूक लागताच चंदन तस्कर असलेल्या तिन्ही व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून चंदनाचे लाकूड, दोन दुचाकी, कुऱ्हाड तसेच कटर जप्त केले आहे.गत काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बजाजवाडी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवास स्थानावरून अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे मोठाले झाड तोडून नेले होते. दोन्ही घटनांची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. तेव्हापासून चंदन चोर व चंदनाची तस्करी करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान तीन अज्ञात व्य
वर्ध्यात पोलिसांना पाहताच चंदन तस्कर पसार; दुचाकीसह साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:08 IST
सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. परंतु, पोलीस येत असल्याची चुणूक लागताच चंदन तस्कर असलेल्या तिन्ही व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला.
वर्ध्यात पोलिसांना पाहताच चंदन तस्कर पसार; दुचाकीसह साहित्य जप्त
ठळक मुद्देसेवाग्रामच्या तलाव परिसरात करीत होते लाकूड स्वच्छ