शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तंत्रज्ञानामुळे स्त्रियांपुढील आव्हाने बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 9:57 PM

तंत्रज्ञानाने स्त्रियांपुढे मोठी आव्हाने उभी केली आहे. त्याचे चांगले-वाईट परिणाम समाज व्यवस्थेवर होताना दिसतात. स्त्रियांनी तंत्रज्ञानाचा वापर व समाजाची बदलती भूमिका याचा सुवर्णमध्य साधून मुलांवर योग्य संस्कार करावे. या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले राहावे म्हणून काळजी घ्यावी, .....

ठळक मुद्दे शुभांगी डांगे : आधार फाऊंडेशनचा महिला मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तंत्रज्ञानाने स्त्रियांपुढे मोठी आव्हाने उभी केली आहे. त्याचे चांगले-वाईट परिणाम समाज व्यवस्थेवर होताना दिसतात. स्त्रियांनी तंत्रज्ञानाचा वापर व समाजाची बदलती भूमिका याचा सुवर्णमध्य साधून मुलांवर योग्य संस्कार करावे. या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले राहावे म्हणून काळजी घ्यावी, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शुभांगी डांगे यांनी केले.आधार फाउंडेशन हिंगणघाट, महिला समितीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी महिला मेळावा घेण्यात आला. तसेच मकरसंक्रांतीच्या पर्वावर स्नेह वृध्दींगत व्हावा म्हणून हळदीकुंकू कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शुभांगी डांगे तर प्रमुख मार्गदर्शक अ. भा. अंनिस राज्य संघटिका छाया सावरकर, जिल्हा संघटिका प्रा. सूचिता ठाकरे, अपर्णा मुडे, प्रतिभा भानखेडे, अनुराधा मोटवानी, अ‍ॅश. माधुरी मुडे, निलोफर शेख चांद यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर प्रबोधन सत्र झाले.यावेळी राजश्री दांडेकर यांनी सावित्रीबाईवर गीत सादर केले. प्रास्ताविक माधुरी विहिरकर यांनी केले. सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या प्रेरणादायी कायार्चा उल्लेख केला. सदर महिला मेआवा आयोजित करण्याची भूमिका आणि आधार फाऊंडेशनची कार्यशैली स्पष्ट केली.प्रमुख मार्गदर्शिका छाया सावरकर यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कार्य करीत असले तरी आमचा देवा-धमार्ला विरोध नाही. कोणतेही धार्मिक कार्य करताना रूढी, परंपरा जोपासताना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, कुठल्याही गोष्टी करतांना त्यातील कार्यकारणभाव समजून घ्या, चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा. पण अंधानुकरण करू नका, असे आवाहन उपस्थित महिलांना केले. अनेक दाखले व उदाहरण देऊन डोळसपणे कार्य करण्याचे त्यांनी महिलांना सांगितले.निलोफर शेख चांद यांनी सावित्रीबाई फुले व जिजामातेच्या जीवनावर प्रकाश टाकला. आधार फाउंडेशनने जातीभेद, धर्मभेद न करता समाजातील सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना बोलावून सर्वधर्म समभावाची जपणूक केली आहे. समाजपरिवर्तन होताना महिलांची भूमिका सांगितली. तर अ‍ॅड. माधुरी मुडे यांनी स्त्री विषयक कायदे आणि भूमिका मांडली. यानंतर बोलताना डॉ. अपर्णा मुडे यांनी स्त्री आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रतिभा भानखेडे यांनी कुटुंबव्यवस्था संबंधी मार्गदर्शन केले. तर अनुराधा मोटवानी यांनी सांगितले की, येथे विचारांचे हळदीकुंकू झाले आहे. वाण म्हणजे वैचारिक आदान प्रदान असून अशा प्रकारचे स्त्रियांचे प्रबोधन हळदीकुंकू उपक्रमातून या शहरातून प्रथमच होत आहे असा उल्लेख केला. यानंतरच्या सत्रात सुचिता ठाकरे यांनी स्त्रियांचे प्रश्न, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचे मार्गदर्शकांनी समाधान केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली लांजेवार आणि अनिता गुंडे यांनी केले. आभार संगीता घंगारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरश्री मुडे, राजश्री दहिरकर, किरण माशलकर, किरण सायंकार, राणी सोमवंशी, शुभांगी नायर, मयुरी देशमुख, मायाताई चाफले, ज्योती निखाडे, सुनीता ईखार, मंजुषा भलमे, वर्षा पाल, प्रेमीला रेवतकर, चंदा साटोने, सविता येळने, माधवी नरड, ज्योती कोहचाडे, इंदूताई देशमुख, सविता येनोरकर, शीतल गिरधर, सविता साठकर, मीनाक्षी महाजन, सुवर्णा भोयर, सविता आंबटकर, रुपाली कामडी, ज्योती हेमने, सविता कुंभारे, माया थुल, किरण निमट, आदींनी सहकार्य केले.मेळाव्यात प्रबोधनपर कार्यक्रमानंतर तिळगुळ देऊन महिलांना आण देण्यात आले. मेळाव्याला परिसरातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.