स्वाभीमानी शासनाविरूद्ध करणार चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:29 IST2018-10-14T00:28:59+5:302018-10-14T00:29:16+5:30
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही.

स्वाभीमानी शासनाविरूद्ध करणार चक्काजाम
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे शासन असल्याने त्यांना त्यांची जागा शेतकरी दाखवून देणार? आता शेतकऱ्यांसाठी ही आरपारची लढाई असून २० आॅक्टोंबरला शेतकरी व कार्यकर्ते आपल्या हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी दिली.
येथील विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, आर्वी विधानसभा अध्यक्ष गौरव वाघ, विश्वनाथ मस्के, समीर घोडे, आर्वी तळेगाव, आष्टी, कारंजा, रोहणा, खरांगणा जळगाव पिंपळखुटा आदी अनेक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्यावी ,सोयाबीन कापूस, तुरीच्या हमीभावाची खरेदी केंद्र सुरू करा, बोंड अळीचे अनुदान हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये अदा करा ,वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, आधी मागणीसाठी सदर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुबोध मोहिते पाटील यांनी सांगितले.
बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य दादा गाडगे यांचा सुबोध मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद सर्कलपदी दिलीप रेवतकर तर सिंधी विहिरी जिल्हा परिषद सर्कल पदी गोपाळ नासरे यांची नियुक्ती करण्यात आली.
या सभेत भाजप काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुबोध मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी स्वाभिमानी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी मोहिते यांनी संवाद साधला.