माय-लेकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 22:09 IST2019-03-18T22:09:04+5:302019-03-18T22:09:18+5:30

पैशाच्या कारणावरून वाद करून मुलासह आईला चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री स्थानिक थूल ले-आऊट परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

Chakahala on the My-Layer | माय-लेकावर चाकूहल्ला

माय-लेकावर चाकूहल्ला

ठळक मुद्देआरोपीला अटक : थूल ले-आऊटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पैशाच्या कारणावरून वाद करून मुलासह आईला चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री स्थानिक थूल ले-आऊट परिसरात घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, थूल ले-आऊट येथील प्रणय उर्फ टिन्या भिमसागर घुसे (१९) याला विक्रमशीलानगर येथील रहिवासी असलेल्या पवन राजेश धनवीज याने घराबाहेर बोलावून त्याच्याशी पैशाच्या कारणावरून वाद केला.
आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने प्रणयला चाकूने पोटावर, हातावर मारून गंभीर जखमी केले. पवन व प्रणय यांच्या कुठल्यातरी कारणावरून वाद सुरू असल्याचे लक्षात येताच प्रणयची आई वाद सोडविण्यासाठी गेली असता त्यांनाही पवन धनवीज यांने चाकूने मारून जखमी केले. या प्रकरणी प्रणय घुसे याच्या तक्रारीवरून आरोपी पवन धनवीज याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ५० व भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४, २५ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

Web Title: Chakahala on the My-Layer