स्थायी समिती सभेला सभापतींची दांडी
By Admin | Updated: December 22, 2014 22:51 IST2014-12-22T22:51:15+5:302014-12-22T22:51:15+5:30
जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना ऐनवेळी जलयुक्त शिवारावरील कार्यशाळेला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. सभापतींनी सभेचे सूत्र हातात घेऊन सभा न घेता त्यांनीही दांडी मारल्यामुळे सोमवारी नियोजित

स्थायी समिती सभेला सभापतींची दांडी
दोनच सदस्यांची हजेरी : कोरमअभावी सभा तहकूब
वर्धा : जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना ऐनवेळी जलयुक्त शिवारावरील कार्यशाळेला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले. सभापतींनी सभेचे सूत्र हातात घेऊन सभा न घेता त्यांनीही दांडी मारल्यामुळे सोमवारी नियोजित असलेली स्थायी समितीची सभा कोरमअभावी तहकूब करावी लागली.
माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे आणि गजानन गावंडे हे दोनच सदस्य सभागृहात सभा सुरु होण्याची वाट पाहत बराच वेळ बसून होते. मात्र एकही सभापती सभागृहाकडे फिरकण्यास आला नाही. अखेर या सदस्यांना परतीचा मार्ग धरावा लागला. सभा तहकूबच करायची होती तर बोलाविले कशाला, असा मार्मिक सवालही या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.
ही सभा १ वाजता सुरू होणार होती. अशातच १२ वाजता कृषी सभापती श्यामलता अग्रवाल मात्र आपल्या कक्षात विभागाची बैठक घेत होत्या. त्यासुद्धा सभागृहात आल्या नाही. याबाबतही उपस्थित सदस्यांनी आपला रोष यावेळी व्यक्त केला.(जिल्हा प्रतिनिधी)