सीईओंनी केले आयएसओ मानांकन प्राप्त शाळेचे निरीक्षण
By Admin | Updated: October 2, 2016 00:57 IST2016-10-02T00:57:38+5:302016-10-02T00:57:38+5:30
आयएसओ मानांकन प्राप्त जि.प. प्राथमिक शाळा हावरे ले-आऊट सेवाग्रामला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट दिली.

सीईओंनी केले आयएसओ मानांकन प्राप्त शाळेचे निरीक्षण
विद्यार्थ्यांशी संवाद : ए-प्लस दर्जाची नोंद
वर्धा : आयएसओ मानांकन प्राप्त जि.प. प्राथमिक शाळा हावरे ले-आऊट सेवाग्रामला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट दिली. यावेळी शाळेतील सुविधा व तेथील शिक्षण पद्धतीचे निरीक्षण केले.
शालेय परिसरातील भौमितिक परसबाग, फुलबाग व शैक्षणिक परिसराचे निरीक्षण करतानाच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ज्ञानरचनावादावर आधारीत शब्दपेट्या अंककार्ड, शालेय भिंती आदींचेही निरीक्षण केले. विद्यार्थ्यांनी लॅपटॉपद्वारे स्वयंअध्ययन केले. वर्गांनी शैक्षणिक साहित्याचा वापर करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर सोडवून दाखविला. कार्तिक हगवणे या पहिलीतील विद्यार्थ्याने प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुरेश हजारे यांची मुलाखत घेतली. मुले शिक्षकाविणा स्वयंअध्ययन करताना आढळली. अंतर्गत व बाह्यरूप शैक्षणिक असल्याने विद्यार्थी दिवसभर शिकत असल्याचे आढळले. जि.प. सीईओ नयना गुंडे यांनी विद्यर्थ्यांशी दोन तास संवाद साधला. मुख्याध्यापिका सुनीता नगराळे व स.अ. प्रकाश कांबळे ज्ञानदानासह शाळेला आर्थिक मदत करतात. याबद्दल गुंडे यांनी ए-प्लस दर्जा देत उत्कृष्ट, असा अभिप्राय नोंदविला.(कार्यालय प्रतिनिधी)