यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:00:27+5:30
कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता आर्वी तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाच्या प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, प्रभारी तहसिलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी जमदाडे , ठाणेदार संपत चव्हाण, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, फौजदार ढोले आदींची उपस्थिती होती.

यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी/देऊरवाडा : कोरोना संसर्गाचा धोका लहान मुलांना जास्त असल्याने पालकांनी दहा वर्षाच्या आतील मुलांना तान्हा पोळ्यासाठी घराबाहेर घेऊन जाऊ नये, शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय महसुल अधिकारी हरीश धार्मिक यांनी केले.
कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता आर्वी तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाच्या प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, प्रभारी तहसिलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी जमदाडे , ठाणेदार संपत चव्हाण, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, फौजदार ढोले आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक गणेशोत्सवात प्रशासनाची परवानगी घ्यावी, सजावट करताना भकपेबाजी करू नये, सार्वजनिक मंडळाची मूर्ती चार फूट व घरगुती गणपती दोन फूट असावी, घरगुती मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दीत जाणे टाळावे साथीच्या रोगांपासून रक्षण करावे वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा, आरोग्य विषयक उपक्रम घ्यावे, धार्मिक कार्यक्रम करीत असताना गर्दी होणार नाही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश देण्यात आले.