सीसीआयचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

By Admin | Updated: December 7, 2014 22:55 IST2014-12-07T22:55:03+5:302014-12-07T22:55:03+5:30

येथील धैर्यशिलराव वाघ स्मृती जनता सहकारी प्रक्रिया संस्थेत केंद्र शासनाच्या भारतीय कापूस निगमने ६ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू केली. प्रारंभी ३,९५० रुपये दराने खरेदी झाली. यावेळी शेतकऱ्यांनी हमीभाव

CCI's salt on the wounds of farmers | सीसीआयचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

सीसीआयचे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

फरक देण्यास नकार : केंद्राला पाठ दाखविताच हमीभावात खरेदी सुरू
रोहणा : येथील धैर्यशिलराव वाघ स्मृती जनता सहकारी प्रक्रिया संस्थेत केंद्र शासनाच्या भारतीय कापूस निगमने ६ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू केली. प्रारंभी ३,९५० रुपये दराने खरेदी झाली. यावेळी शेतकऱ्यांनी हमीभाव देण्याची मागणी केली. यावर १३ नोव्हेंबर पासून कापसाला ४,०५० रुपये दर देण्यात आला. यापूर्वी कापूस विकाणाऱ्या शेतकऱ्यांनी सीसीआयला फरकाचे शंभर रुपये देण्याची मागणी केली. यावर कंपनीने ‘रात गयी सो बात गयी’ असे म्हणत शेतकऱ्यांची मागणी धुडाकवून लावली.
सीसीआयने ६ ते १२ नोव्हेंबर २०१४ या सात दिवसात ३,९५० रुपये क्विंटल दर देत कापूस खरेदी केला. यावेळी कापूस उत्पादकांनी हमी भावापेक्षा दर शंभर रुपयांनी कमी असल्याबाबत संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील सीसीआयच्या इतर केंद्रावर भाव ४,०५० होता, यामुळे तोच दर येथेही देण्याची मागणी केली. याकडे सीसीआयचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांनी केंद्रावर कापूस आणण्यास टाळाटाळ करणे सुरू केले. कापूस येत नसल्याचे पाहून सीसीआयच्या येथील केंद्रावर १३ नोव्हेंबर २०१४ पासून कापसाचा हमीभाव देणे सुरू केले. पण ज्यांनी प्रारंभीच्या दिवसात कापूस विकला त्यांची शंभर रुपयांनी लूट झाल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. भारतीय कापूस निगम हे व्यापाऱ्यापेक्षाही लुटारू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान विकला त्यांनी शंभर रुपयाच्या फरकाबाबत केंद्राधिकाऱ्यांना विचारले असता सीसीआय बॅक इफेक्ट देत नसते, असे उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकऱ्यांनी ६ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान विकलेला कापूस पहिल्या वेच्याचा सर्वांचा उत्तम कापूस होता. त्यांना हा फरक न देणे सीसीआयला अन्यायकारक वाटले नाही. साधारणत: अशी भूमिका खाजगी व्यापारी घेतात. शासन मात्र स्वत:च्या खरेदी केंद्रात खरेदी भावाबाबत केलेला कोणताही बदल बॅक इफेक्टने लागू करतात. येथे मात्र तसे होत नसल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

Web Title: CCI's salt on the wounds of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.