सावधान; रेड झोनकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:23+5:30

मुंबई येथील एका हाऊस किपिंग कंपनीत कामाला असलेला हा तरुण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हताश झाला. त्यानंतर त्याने आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेत त्या निर्णयावर कृती केली. जवळ पैसे नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला अशा परिस्थितीत या तरुणाने रोहणाच्या नागापूर ही वस्ती २० मे रोजी गाठली.

Caution; Walk to the red zone! | सावधान; रेड झोनकडे वाटचाल!

सावधान; रेड झोनकडे वाटचाल!

googlenewsNext
ठळक मुद्देरोहणा येथे आढळला नवा रुग्ण । १२ वर पोहोचली कोरोनाबाधितांची संख्या

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : शुक्रवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या अकरा इतकी होती. तर शुक्रवारी रात्री उशीरा काही व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. यात मुंबई येथून रोहणा येथे परतलेला २५ वर्षीय तरुण कोरोना बाधित असल्याचे पुढे आल्याने वर्धा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता बारा इतकी झाली आहे. कासवगतीने जिल्ह्यात कोविड रुग्ण संख्येत भर पडत असून जिल्हा प्रशासनही विविध उपाययोजना करीत आहे.
मुंबई येथील एका हाऊस किपिंग कंपनीत कामाला असलेला हा तरुण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हताश झाला. त्यानंतर त्याने आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेत त्या निर्णयावर कृती केली. जवळ पैसे नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला अशा परिस्थितीत या तरुणाने रोहणाच्या नागापूर ही वस्ती २० मे रोजी गाठली. कोरोना बाधित जिल्ह्यातून तरुण गावात दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्याची आरोग्य तपासणी करून त्याला क्वारंटाईन केले.
त्यानंतर या तरुणाची प्रकृती बिघडल्याने त्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालावरून हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. सदर तरुणाच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे. शिवाय त्यांच्या घरातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

दोन दिवस परिसरात राहणार ‘जनता कर्फ्यू’
रोहणा परिसरात कोरोना बाधित आढळल्याने या परिसरात कंटेन्मेंट व बफर झोन तयार करून परिसर सील करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर खबरदारीचा उपाय म्हणून रोहणा व नागापूर परिसरात पुढील दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. या कालावधीत परिसरात संचारबंदीची प्रभावी अंमलबजाणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कसेबसे गाठले गाव
मुंबई येथून निघालेला हा तरुण कधी पायदळ तर कधी मिळेल त्या वाहनाचा प्रवास करून नागापूर येथे पोहोचला. हाच तरुण आता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुलगावात काढली होती रात्र
सदर तरुण सुमारे पाच महिन्यांपूर्वी मुंबई येथे कामाच्या शोधात गेला होता. परंतु, कोरोना काळात त्याचा रोजगार हिरावल्या गेला. अशातच त्याने गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो कसाबसा पुलगाव पर्यंत पोहोचला. १९ मे रोजी त्याने पुलगावात उघड्यावर रात्र काढली. त्यानंतर तो मित्राच्या दुचाकीने गावात दाखल झाल्याचे सांगण्यात येते.
त्यानंतर त्याने रोहणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून डॉ. कुरवाडे यांच्याकडून आरोग्य तपासणी करून घेतली होती. त्यानंतर त्याला आर्वी येथील एका ठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध सूरू
सदर कोरोना बाधित तरुणाच्या निकट संपर्कात आलेल्या एका तरुणासह पाच व्यक्तींचा शोध सध्यास्थितीत आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी घेतला आहे. त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर आणखी कुणी व्यक्ती या तरुणाच्या निकट संपर्कात आले काय याचा शोध सध्या घेतला जात आहे.
अहवाल प्राप्त होताच ठाणेदारांनी गाठले गाव
मुंबई येथून रोहणा येथे आलेला तरुण कोरोना बाधित निघाल्याची माहिती मिळताच खरांगणाचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी आपल्या चमूसह रोहणा गाठले. शिवाय कोरोना बाधित तरुणाच्या आई-वडिलांसह भाऊ-बहिण तसेच एका तरुणाला ताब्यात घेत त्यांची डॉ. कुरवाडे यांच्या हस्ते आरोग्य तपासणी करून घेतली. या व्यक्तींना आर्वी येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कोरोनाबाधित तरुणावर सावंगीच्या रुग्णालयात उपचार सूरू
कोरोना बाधित रुग्णाला सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गावातील छोट्या छोट्या गोष्टींवर तलाठी एकापुरे, कृषी सहाय्यक खोंडे, जमादार उकंडे, सरपंच सुनील वाघ, पोलीस पाटील मिथून ताल्हन, तंटामुक्त समिती अध्यक्ष फनिंद्र रघाटाटे, ग्रा.पं. सचिव गोरे आदी लक्ष ठेऊन आहेत.
तसेच उपविभागीय महसलू अधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव व तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी वरिष्ठांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन नागापूर व रोहणा या गावांचा कंटेन्मेंट तर वाई, दिघी, चोरआंब व बोदड या गावांचा बफर झोनमध्ये समावेश करून खबरदारच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Caution; Walk to the red zone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.