सट्टीपट्टीसह रोख १.१९ लाख जप्त
By Admin | Updated: August 29, 2014 00:00 IST2014-08-29T00:00:18+5:302014-08-29T00:00:18+5:30
सट्टीपट्टीवर जुगार खेळताना दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ५ लाखांच्या सट्टापट्टी व एक लाख १९ हजार २३० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सट्टीपट्टीसह रोख १.१९ लाख जप्त
दोघांना अटक : जिल्ह्यात नेटवर्क, सेवाग्राम पोलिसांची वर्धेत कारवाई
वर्धा : सट्टीपट्टीवर जुगार खेळताना दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून सुमारे ५ लाखांच्या सट्टापट्टी व एक लाख १९ हजार २३० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांडे ले-आऊट परिसरात सेवाग्राम पोलिसांनी गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास केली. सुनील पांडुरंग भागवत (३३) व काशीनाश सोनकुसरे (३४) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस सूत्रानुसार, सुनील हा आपल्या राहत्या घरी वरच्या मजल्यावरील खोलीत सट्टापट्टी चालवत होता. जिल्ह्यात लागत असलेल्या सट्टापट्टी तो स्वत: घेत होता. याची माहिती सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. या अनुषंगाने एसपी अनिल पारसकर व ठाणेदार पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रामटेके यांच्या नेतृत्त्वात गुन्हे शोध पथकातील अनिल कांबळे, प्रदीप राऊत, नरेंद्र डहाके, झामरे, पंकज डहाके यांनी अचानक धाड घात्लून ही कारवाई केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर सट्टापट्टीच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.(जिल्हा प्रतिनिधी)
कुख्यात घरफोड्या सिंकदर अखेर जेरबंद
राज्यातील कुख्यात घरफोड्या सिकंदर उर्फ सैय्यद सिंकदर सैय्यद अक्तर रा. मोमीनपुरा जि. बिड हा वर्धा पोलिसांच्या हाती आला आहे. त्याने वर्धेत केलेल्या इतरही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचे दोघे साथीदार फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. या कारवाईत त्याच्याजवळून रोख एक लाख रुपये व चोरीत वापरलेली कार असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलर आहे.
२६ मे २०१४ रोजी अतुल प्रकाश केळकर रा. भारत हाऊसिंग सोसायटी जेल रोड यांच्या घरी चोरी झाली होती. ते कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे दार तोडून व ग्रिल काढून घरात प्रवेश करून रोख एक लाख रुपये व एक कार तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणात शहर पोलिसांनी संपूर्ण राज्यभर घरफोड्या करणारा अरोपी नामे सिकंदर उर्फ सैय्यद सिंकदर सैय्यद अक्तर रा. मोमीनपुरा जि बिड, यास अटक करून त्याच्याकडून दागिने व इंडिका व्हीस्टा कार असा एकूण ३ लाख ३१ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याचा फरार साथीदार बबलू सिंकदर शेख रा. अहमदनगर, सैय्यद सिराज सैय्यद लियाकत रा. पुरपिडीत कॉलनी बिड या दोघांचा शोध घेणे सुरू आहे. न्यायालयाने सदर आरोपींना कोठडी मंजूर केली असून त्यांच्याकडून अजून बरेच गुन्ह्याची कबुली देण्यात आली आहे. सदर कारवार्ई ठाणेदार एम.पी. बुरांडे, उपनिरीक्षक वासुदेव बोंदरे, ज्ञानेश्वर निशाणे, गजानन लामसे, गजानन गहूकर, आकाश चुंगडे, धर्मेंद्र अकाली, सचिन खैरकार, विशाल बंगाले यांनी केली.