विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 28, 2015 01:41 IST2015-05-28T01:41:40+5:302015-05-28T01:41:40+5:30

सेलू येथील विवाहितेने दोन चिमुकल्यासह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

In the case of suicide of a husband, | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

आकोली : सेलू येथील विवाहितेने दोन चिमुकल्यासह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. मृतक शीतल आशिष लोहिया हिच्या आईने सेलू पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पती आशिष गोपालदास लोहिया, गोपालदास लोहिया, सासू विजया लोहिया, नारायणदास लोहिया, उषा नारायणदास लोहिया असा पाच जणांवर भादंविच्या कलम ४९८, ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ मे ला शीतल घरून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र कुठेच थांगपत्ता न लागल्याने सेलू पोलिसात बेपत्ता होण्याची तक्रार देण्यात आली. दरम्यान काटोल तालुक्यातील भरतवाडा रेल्वेस्थानकाजवळ मुलगी गुंजन (६), मुलगा हार्दिक (१) व शीतल या तिघांचे मृतदेह आढळले. शीतलने मुलांसह आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली. सेलू पोलीस घटनेचा तपास करीत असताना उषा भूतडा रा. दुर्ग यांनी मुलीला आत्महत्येस सासरच्या मंडळीने प्रवृत्त केल्याचा आरोप करीत बुधवारी पोलिसात तक्रार दिली. सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या सतत मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. घटनेचा तपास सेलू पोलीस करीत आहे.(वार्ताहर)

Web Title: In the case of suicide of a husband,