नरबळी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

By Admin | Updated: May 8, 2015 01:49 IST2015-05-08T01:49:07+5:302015-05-08T01:49:07+5:30

येथील बहुचर्चित रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील आरोपी आसीफ उर्फ मुन्ना पठाण याच्या जमिनाकरिता अर्ज करण्यात आला असून त्यावर गुरुवारी सुनावणी होती.

The case of postmortem was postponed | नरबळी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

नरबळी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

वर्धा : येथील बहुचर्चित रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील आरोपी आसीफ उर्फ मुन्ना पठाण याच्या जमिनाकरिता अर्ज करण्यात आला असून त्यावर गुरुवारी सुनावणी होती. यात ती झाली नाही. ती पुढे ढकलण्यात आली असून सोमवारी होण्याची शक्यता आहे.
आर्वी नाका परिसरातील झोपडपट्टी येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरण केवळ वर्र्धेत नाही तर राज्यात गाजले. या प्रकरणात वर्धा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. तो कारागृहात असताना जामिनाकरिता अर्ज सादर करण्यात आला. यात ३० एप्रिल रोजी एक सुनावणी झाली. यात गुरुवारची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सदर प्रकरण न्यायाधीश चांदेकर यांच्या न्यायालयात सुरू असून आसिफच्या वकिलांनी त्याला जामीन मिळण्याचा अर्ज सादर करताच शासकीय वकीलांकडून आलेल्या अर्जावर चर्चा करीत त्याचा सदर प्रकरणाची तारीख वाढविण्यात आली आहे.
रूपेश नरबळी प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच वर्धेतील काही सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी न्यायालयात गर्दी केली होती. यात रूपेशच्या आई-वडिलांचा सहभाग होता. या नरबळी प्रकरणातील आरोपीला जामीन मिळतो वा शिक्षा होते यावर सर्वत्र चर्चा होत आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या सुणावनीकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The case of postmortem was postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.