लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर जाम चौरस्ता शिवारात ट्रकने एकास चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. सचिन गुणवंत मोहरे (३०), असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहीती नुसार, मंगळवारी रात्री जाम चौरस्ता परिसरात सिंदी रेल्वे येथील सचिन मोहरे हे सिंदी रेल्वेकडे जाणाऱ्या वाहनाची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान एम.एच.४० ए.के.२०७ क्रमांकाचा ट्रक चालक राहुलकुमार दुबे (२६) याने आपल्या ताब्यातील ट्रक मागे घेत असताना थेट सचिनच्या अंगावर चढविला. याप्रसंगी वाहनाचे चाक सचिनच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती साय्यहक पोलिस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांना मिळताच त्यांनी व त्यांचे सहकारी शरद इंगोले, चंदु बन्सोड, बेल, त्रिपुडे आदींनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय ट्रक चालकास ताब्यात घेवून समुद्रपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
भरधाव ट्रकने इसमास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:33 IST
नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर जाम चौरस्ता शिवारात ट्रकने एकास चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. सचिन गुणवंत मोहरे (३०), असे मृतकाचे नाव आहे.
भरधाव ट्रकने इसमास चिरडले
ठळक मुद्देजाम चौरस्त्यावरील घटना