कारचोर अटकेत; एलसीबीची कारवाई
By Admin | Updated: June 18, 2017 00:35 IST2017-06-18T00:35:44+5:302017-06-18T00:35:44+5:30
रामनगर परिसरातून कार चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

कारचोर अटकेत; एलसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रामनगर परिसरातून कार चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुनील भगवान सोमनाथे रा. बोरगाव (मेघे) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस सुत्रानुसार, तुकाराम वॉर्ड येथील महेंद्र वासेवार यांच्या मालकीची एमएच २० बी.एन. ४४५१ क्रमांकाची कार चोरट्याने घरासमोरून लंपास केली होती. या प्रकरणी तक्रारीवरून भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यानी केला असता संशयीत म्हणून सुनील सोमनाथे याला ताब्यात घेतले. या गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता, सदर आरोपीने साथीदार नामे अरविंद सोयाम, रा. चामोर्शी, गडचिरोली याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. सुनील याने लपवून ठेवलेली कार जप्त करीत अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस कर्मचारी नरेंद्र डहाके, परवेज खान, सचिन खैरकार, जगदीश डफ यांनी केली.