सत्याग्रही घाटात कार दरीत कोसळली
By Admin | Updated: March 12, 2015 01:32 IST2015-03-12T01:32:57+5:302015-03-12T01:32:57+5:30
नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने येणारी एमएच २७ एएन १०१ क्रमांकाची कार तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात असंतुलित होवून सरळ दरीत कोसळली.

सत्याग्रही घाटात कार दरीत कोसळली
तळेगाव(श्या.पंत) : नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने येणारी एमएच २७ एएन १०१ क्रमांकाची कार तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात असंतुलित होवून सरळ दरीत कोसळली. यात तीन महिलांसह चौघांचा समावेश होता. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्याग्रही घाटातून जाताना डाव्या वळणावर चालकाच्या हातून कार असंतुलित होऊन सेफ्टीगार्डला धडकली. प्रथम झाडाला धडकून पलट्या घेत दरीत कोसळून दुसऱ्या झाडाला जाऊन ५० फूट खाली ही कार कोसळली. एका महिलेच्या डोक्यावर मार लागला. मागाहून येणाऱ्या वाहनधारकांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढले. जखमींची नावे कळू शकली नाहीत. आर्वी उपजिल्हा रूग्णालयात जखमींना हलविले. सर्व जण अमरावतीच्या राठी परिवारातील असल्याची माहिती आहे. तळेगावचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मुसा पठाण व जमादार घनश्याम लंगडे यांनी पंचनामा केला.(वार्ताहर)