शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कारचा झाला चेंदामेंदा; पुलगावाजवळ भीषण अपघातात तीन ठार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 14:10 IST

Big Accident : पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले

ठळक मुद्देअपघातात तिच्या आई वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला हे सर्व नागपुरमधील हिंगणा परिसरातील रहिवाशी होते.

वर्धा :  मंगळवारी  पहाटे पुलगाव नजीकच्या मलकापूर शिवारात नेक्सा कंपनीची बोलेनो कार क्रमांक MH-40 BE 8394 गाडीने उभ्या ट्रकवर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला.

या अपघातात दिलीप वामनराव इंगोले, सुरेखा दिलीप इंगोले, दीपक चैतराम मुंजेवार हे ठार झाले. अपघातग्रस्त गाडी ही शेगाववरुन नागपूरला जात होती व मुलगी गाडी चालवित होती. अपघातात तिच्या आई वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला हे सर्व नागपुरमधील हिंगणा परिसरातील रहिवाशी होते. पुलगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

पुलगाव येथे झालेल्या भीषण अपघातात कारचालक हेमंती दीपक मुंजेवार वय 39 वर्षे तिने निष्काळजीपणे वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रक क्रमांक एम एच 27 एक्स 24 01 धडक मारली या अपघातात हेमंतीचे पती दीपकसह आई वडील सुरेखा आणि दिलीप इंगोले घटनास्थळीच ठार झाले. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नारळ वार व डॉक्टर टेकाम यांनी शवविच्छेदन केले. या अपघातात मुलगा तेजस मुंजेवार वय 14 वर्षे व मुलगी केजल मुंजेवार हे थोडक्यात बचावले. पोलिसांनी कार चालक हेमंती मुंजेवार तिच्यावर कलम 279 /304अ/ भादंवि तसेच सहकलम 184 मोटर वाहन कायदा दाखल करण्यात आले पुढील तपास पुलगाव पोलिस करीत आहे

सर्वजण राय टाउन हिंगणा नागपूर येथील रहिवासी होते आज सायंकाळी सहा वाजता डिगडोह महिंद्रा कंपनीच्या मागे हिंगणा येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू