कार उलटली...
By Admin | Updated: January 10, 2016 02:33 IST2016-01-10T02:33:39+5:302016-01-10T02:33:39+5:30
नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळून

कार उलटली...
कार उलटली... नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळून तळेगाव (श्या.पंत.) येथील कार उलटली. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. यात दोघे जखमी झाले. औरंगाबाद येथे लग्नसोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी सुनील काळे (४०) हे त्यांच्या मालकीची कार एम.एच.४९ बी. ९७९० ने मित्रासह जात होते. या अपघातात कारमधील गिरीश (३८) व सुनील काळे हे दोघे जखमी झाले. त्याच लग्नसोहळ्यात जात असलेल्या त्यांच्या मित्रांनी त्यांना आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.