शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

ग्रा.पं.च्या 472 जागांसाठी 1448 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  वर्धा : जिल्ह्यातील एकूण ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या ...

ठळक मुद्देअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील एकूण ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत ५० ग्रा.पं.मधील ४७२ जागांसाठी एकूण १ हजार ४४८ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयात इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. वर्धा तालुक्यातील तीन, सेलू तालुक्यातील तीन देवळी तालुक्यातील तीन, आर्वी तालुक्यातील सात, आष्टी तालुक्यातील सात, कारंजा तालुक्यातील आठ, हिंगणघाट तालुक्यातील पाच तर समुद्रपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या ५० ग्रा.पं.च्या कार्यक्षेत्रात एकूण १७३ प्रभाग असून मतदारांना ४७२ सदस्य निवडून द्यायचे आहेत. १५ जानेवरीला प्रत्यक्ष मतदान होणार असून १ लाख १८ हजार ६३३ मतदार या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. सुरूवातीला इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच नामनिर्देशन अर्ज दाखल करणे क्रमप्राप्त करण्यात आले होते. पण नंतर ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे मुभा देण्यात आली. मंगळवारपर्यंत एकूण ६७७ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ७७१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ५० ग्रा.पं.तील ४७२ जागांसाठी १ हजार ४४८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी छानणीदरम्यान किती उमेदवारांचे अर्ज अवैध ठरतात तसेच अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  

१५ जानेवारीला १.१८ लाख मतदार बजावणार हक्कवर्धा तालुक्यातील ३४ मतदार केंद्रांवरून २१२२३, सेलू तालुक्यातील २३ केंद्रांवरून ११९२६, देवळीतील ९ केंद्रांवरून ५२४७, आर्वी तालुक्यातील २७ केंद्रांवरून १४४६६, आष्टी तालुक्यातील २२ केंद्रांवरून १३४४१, कारंजा तालुक्यातील २७ केंद्रांवरून ११७०६, हिंगणघाट तालुक्यातील १६ केंद्रांवरून ९४६९ तर समुद्रपूर तालुक्यातील ५९ केंद्रांवरून ३११५५ मतदार १५ जानेवारीला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.   

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक