हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी
By Admin | Updated: October 25, 2014 01:39 IST2014-10-25T01:39:53+5:302014-10-25T01:39:53+5:30
कापूस खरेदीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकऱ्यांची लुट होत आहे. बाजार समितीत कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून..

हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी
आर्वी : कापूस खरेदीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकऱ्यांची लुट होत आहे. बाजार समितीत कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी १०० क्विंटलची आवाक झाली. यावेळी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी म्हणजेचे ३ हजार ८०० रुपये दर देण्यात आला.
शासनाने कापूस खरेदीचा हमी भाव ४ हजार ५० तर सोयाबीन ३ हजार ७५० रुपये जाहीर केला आहे; परंतु व्यापाऱ्यांनी आर्वीत पहिल्या दिवशी ३ हजार ८०० रुपये दराने १०० क्विंटल कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लुट केली आहे़
दरवर्षी शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन खरेदी करण्याचे शासन दर ठरवून देते़ मात्र व्यापारी त्यांना कधी त्यापेक्षा कमी तर कधी त्यापेक्षा अधिक दर देत असतात. यंदा शेतकऱ्यांची परिस्थती हालाखीची असल्याने त्यांची व्यापाऱ्यांकडून लुट होत असल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांनी कापूस बाजारात विकून दिवाळी साजरी करण्यासाठी कापूस व्यापाऱ्यांना विकला़ शेतकऱ्यांच्या या अडीचा लाभ घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करण्याचा सपाटाच सुरू केला आहे. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिवाळीनंतर २७ आॅक्टोबर रोजी सोयाबीन खरेदी सुरू करण्यात येणार आहे़
शासकीय हमीभाव जाहीर केल्यावरही कमी भावाने कापूस खरेदी सुरू आहे़ यावर्षी सोयाबीन कपाशी पिकाची नापिकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अपेक्षित पिकाची आराजी नसताना भावातही लुट होत असल्याने केंद्रशासनाने शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालून सी़सी़आय़ व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाला हमीभावाने कापूस व नाफेडला सोयाबीन खरेदी करण्याचे तातडीने आदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबविण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)