११ लाख क्विंटल कापसाची खरेदी

By Admin | Updated: February 9, 2016 01:46 IST2016-02-09T01:46:52+5:302016-02-09T01:46:52+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खासगी कापूस यार्डमध्ये ३१ जानेवारीपर्यंत आलेली आवक ११ लाख क्विंटलच्यावर गेली आहे.

Buy 11 lakh quintals of cotton | ११ लाख क्विंटल कापसाची खरेदी

११ लाख क्विंटल कापसाची खरेदी

हिंगणघाट बाजार समितीचा विक्रम
हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खासगी कापूस यार्डमध्ये ३१ जानेवारीपर्यंत आलेली आवक ११ लाख क्विंटलच्यावर गेली आहे. मागील वर्षीचा याच कालावधीतील विक्रम मोडीत १ लाख ७० हजार क्विंटल कापसाची अधिक आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
या बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून विदर्भातील तसेच आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना आकृष्ट करून मोठ्या प्रमाणावर आवक वाढविली. एका रुपयात जेवण, मार्केट यार्डमध्ये रोख चुकारा, मोजमापांवर नियंत्रण, शहर वाहतुकीची सोय, कापसाची थेट विक्रीचा दलालमुक्त पर्याय उपलब्ध असल्याने येथे कापसाची आवक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. येथे राबविण्यात येत असलेल्या योजनांमुळे विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती आणि नागपूरसह आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांद्वारे येथे कापूस विकावयास आणल्या जातो.
यावर्षीच्या सुरुवातीच्या हंगामात कापसाला ४ हजार रुपये क्विंटल दराने सुरुवात झाली. दरात वाढ होवून हा दर ४८०० पर्यंत वाढला. आता सध्या ४६०० रुपये प्रति क्विंटल सर्वोच्च दर आहे. मागील वर्षीच्या हंगामात हिंगणघाटच्या बाजारपेठेत एकूण १६ लाख ५७ हजार क्विंटलची कापसाची आवक झाली होती. सध्याची ३१ जानेवारी पर्यंतची आवक याच कालावधीच्या तुलनेत १ लाख ७० हजार क्विंटलने अधिक आहे. ही आवक अशीच सुरू राहिल्यास मागील वर्षीचा विक्रम मोडल्यास नवल राहणार नाही. या बाजार समितीने अनेक योजना राबविल्याने अनेक शेतकरी आकृष्ट झाले असून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. या बाजार समितीच्या नावावर नवनव्या विक्रमांची नोंद होत असून विदर्भातील नावलौकीक प्राप्त झालेली ही बाजार समिती ठरली आहे. बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळांनी राबविलेल्या यशस्वी योजनांमुळे हे शक्य झाले आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Buy 11 lakh quintals of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.