बसमधून सोन्याचे दागिने लांबविले
By Admin | Updated: May 7, 2014 02:27 IST2014-05-07T02:27:14+5:302014-05-07T02:27:14+5:30
बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने सुटकेसचे लॉक तोडून सोन्याचे दागिने लंपास केले़ ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास

बसमधून सोन्याचे दागिने लांबविले
वर्धा : बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने सुटकेसचे लॉक तोडून सोन्याचे दागिने लंपास केले़ ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वर्धा ते चाका (मजरा) प्रवासादरम्यान घडली़ यात अखिलेश धोंगडे यांचे ३ लाखाचे नुकसान झाल्याची तक्रार त्यांनी मंगळवारी वर्धा शहर पोलिसात दिली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश धोंगडे रा़ धामणगाव (रेल्वे) हे वर्धा बसस्थानक येथून चाका (मजरा) गावाकडे जाण्याकरिता बसमध्ये बसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई होती़ बसमध्ये गर्दी असल्याने त्यांनी त्यांच्याजवळ असलेली सुटकेस बसमध्ये सामान ठेवण्याकरिता असलेल्या टपावर ठेवलेली होती़ बसमध्ये असलेल्या गर्दीचा लाभ घेत चोरट्याने सुटकेसचे लॉक तोडून त्यातील सोन्याचा पोहेहार, मंगळसूत्र, दोन अंगठ्या, तीन गोफ, कानातले, नेकलेस व सोन्याचे नाणे असा आदी साहित्य लंपास केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अखिलेश लोखंडे यांनी मंगळवारी वर्धा शहर ठाण्यात याबाबत तक्रार दिली़ तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द भांदविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ चोरट्यांचा तपास पोलीस करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)