समर्थ नगरीला झुडपांचा विळखा

By Admin | Updated: October 17, 2016 01:00 IST2016-10-17T01:00:26+5:302016-10-17T01:00:26+5:30

शहरालगतच्या ग्रामपंचायतींचे शहरीकरण होऊ लागले आहे. मोठा करही वसूल केला जात आहे.

Bunch of shrubs in the city of Samartha | समर्थ नगरीला झुडपांचा विळखा

समर्थ नगरीला झुडपांचा विळखा

असुविधांचा बाजार : ग्रामपंचायत प्रशासनाचा कानाडोळा
वर्धा : शहरालगतच्या ग्रामपंचायतींचे शहरीकरण होऊ लागले आहे. मोठा करही वसूल केला जात आहे. असे असले तरी सुविधा पुरविण्यात ग्रा.पं. प्रशासन कमकुवत ठरत आहे. परिणामी, नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. साटोडा ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या समर्थ नगरातही रहिवासी भाग झुडपांनी वेढला आहे.
समर्थ नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा आहेत. या भागात झुडपे वाढली असून सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर आहे. परिणामी, तेथील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच राहावे लागत आहे. या परिसरातील झुडपांची गत कित्येक दिवसांपासून कटाई करण्यात आली नाही. ग्रा.पं. प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Bunch of shrubs in the city of Samartha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.