शतकोटी वृक्ष लागवडीवर बुलडोजर

By Admin | Updated: January 4, 2015 23:16 IST2015-01-04T23:16:27+5:302015-01-04T23:16:27+5:30

कानगाव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कानगाव कापसी मार्गावर शतकोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले. त्या वृक्षांच्या संगोपणाचे काम सुरळीत

Bulldozer on the planting of 100 percent of trees | शतकोटी वृक्ष लागवडीवर बुलडोजर

शतकोटी वृक्ष लागवडीवर बुलडोजर

हिरवळीचे स्वप्न धुसर : रस्ता रूंदीकरणाच्या नावावर तोडली ९५० झाडे
रूपेश खैरी - वर्धा
कानगाव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कानगाव कापसी मार्गावर शतकोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले. त्या वृक्षांच्या संगोपणाचे काम सुरळीत सुरू होते. अशात या रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी देण्यात आली. रस्त्याचे काम सुरू करताना देवळी बांधकाम विभागाच्यावतीने कुठलीही परवानगी न घेता या झाडांवर बुलडोजर चालविला. यात तब्बल ९५० झाडे तोडल्या गेली. यामुळे प्रशासनाकडूनच शासनाच्या हिरवळीच्या स्वप्नाला तडे जात असल्याचे बोलले जात आहे.
शासनाच्या निर्देशाने कानगाव जिल्हा परिषद क्षेत्रात एकूण २ हजार ८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात कोसुर्ला ते कानगाव या मार्गावर ६०० तर कोसुर्ला ते कापसी मार्गावर ५०० झाडे लावली. लावलेल्या या झाडांचे बिहार पॅटर्न नुसार संगोपण सुरू आहे. मनरेगांतर्गत याकरिता ग्रामपंचायतीच्यावतीने एका मजुराची नियुक्ती करण्यात आली. यातील बरीच झाडे आज वाढली आहेत. ज्या झाडांना जनावरांचा धोका उद्भवतो त्या झाडांना ग्रामपंचायतीच्यावतीने काटेरी कुंपन करण्यात आले आहे; मात्र ही झाडे आता धोक्यात आली आहेत.
या रस्त्याची वाहतूक वाढल्याने रस्त्याचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा भाग देवळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात येत असल्याने त्यांच्याकडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. काम करताना या विभागाच्यावतीने ग्रामपंचायतीकडून कुठलीही परवानगी न घेता रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही झाडे ताडून टाकली.

Web Title: Bulldozer on the planting of 100 percent of trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.