वर्धा जिल्ह्यात बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:27 PM2020-05-15T16:27:43+5:302020-05-15T16:28:14+5:30

वर्धा जिल्ह्यात असलेल्याकारंजा घाडगे तालुक्यातील बोदरठाणा येथील शेतकरी जनार्दन देवाशे यांच्या शेतात गुरुवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान बैलांची आपसात टक्कर झाल्याने एक बैल विहिरीत जाऊन पडला.

A bull fell into a well and died in Wardha district | वर्धा जिल्ह्यात बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

वर्धा जिल्ह्यात बैलाचा विहिरीत पडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देदोन बैलांच्या टक्करीत झाला अपघात


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यात असलेल्याकारंजा घाडगे तालुक्यातील बोदरठाणा येथील शेतकरी जनार्दन देवाशे यांच्या शेतात गुरुवारी संध्याकाळी चारच्या दरम्यान बैलांची आपसात टक्कर झाल्याने एक बैल विहिरीत जाऊन पडला. ही विहीर ७० फूट खोल असून ती पुरुषोत्तम गाडगे यांच्या मालकीची आहे. या खोल विहिरीत त्याला मार लागल्याने तो विहिरीतच मरण पावला. यामुळे देवाशे यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यासाठी बैल हा उजवा हात मानला जातो. अशा परिस्थितीत बैल मरण पावल्याने या शेतकऱ्यांचे काम ठप्प झाले आहे.

Web Title: A bull fell into a well and died in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.