क्षमता निर्माण करा आणि भरारी घ्या
By Admin | Updated: November 22, 2014 01:34 IST2014-11-22T01:34:56+5:302014-11-22T01:34:56+5:30
बालकांना त्यांचे हक्क सहजपणे उपलब्ध करून देताच बालकांनीही क्षमता निर्माण करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घ्यावी, ...

क्षमता निर्माण करा आणि भरारी घ्या
वर्धा : बालकांना त्यांचे हक्क सहजपणे उपलब्ध करून देताच बालकांनीही क्षमता निर्माण करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले़
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या सभागृहात बालकांचे हक्क आणि संवाद या कार्यशाळेचा शुक्रवारी समारोप झाला़ त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते़ यावेळी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनीही विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. युनिसेफचे राज्य सल्लागार तानाजी पाटील, कामिनी कपाडीया, नम्रता कृपलानी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मनिषा कुलसुंगे, जिल्हा बाल संस्कार अधिकारी दिलीप रोठाड उपस्थित होते़ बालकांच्या हक्कासंदर्भात अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील ८५ विद्यार्थ्यांनी दहा गटात बालहक्कासंबंधी धोरण कसे असावे याचा आराखडा तयार करून सादर केला़ १८ वर्षे वयोगटापर्यंत मुले व मुलींसाठी बालधोरण तयार करण्यात आले आहे़ संचालन अविनाश काकडे यांनी केले तर आभार बुद्धदास मिरगे यांनी मानले़(प्रतिनिधी)