महिलांकरिता स्वच्छतागृह बांधा

By Admin | Updated: December 26, 2015 02:20 IST2015-12-26T02:20:47+5:302015-12-26T02:20:47+5:30

शहरातील मुख्य मार्गावर आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी महिला प्रसाधनगृहे नाही. परिणामी बाजारपेठेत येणाऱ्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Build a bathroom for women | महिलांकरिता स्वच्छतागृह बांधा

महिलांकरिता स्वच्छतागृह बांधा

आपची मागणी : नगराध्यक्षांना निवेदन सादर
हिंगणघाट : शहरातील मुख्य मार्गावर आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी महिला प्रसाधनगृहे नाही. परिणामी बाजारपेठेत येणाऱ्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे नवीन प्रसाधनगृहांची मागणी येथील आम आदमी पार्टीच्या वतीने नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहरात महिलांसाठी स्वच्छ, प्रशस्थ व योग्य जागी प्रसाधनगृह असणे गरजेचे आहे. प्रसाधनगृहाअभावी महिलांची नेहमीच कुचंबना होते. लोकवस्ती वाढत असल्याने ही मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ही समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन निवेदन स्वीकरताना नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी दिले. नगर पालिकेकडून विठोबा चौकाजवळ असलेल्या प्रसाधन गृहांचे विस्तारीकरण, अभ्यंकर शाळेजवळ प्रसाधन गृहाची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. शिष्टमंडळात मनोगत रूपारेल, प्रमोद जुमडे, नरेंद्र चुगडे, राजू अडगुळे, भारत पवार, अखिल धाबर्डे, अजय पोहणकर, विनोद कुंभारे आदींचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Build a bathroom for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.