१० मिनिटांच्या विलंबासाठी बजेटची सभा केली रद्द

By Admin | Updated: February 25, 2016 01:55 IST2016-02-25T01:55:12+5:302016-02-25T01:55:12+5:30

नगर परिषदेच्या २०१५-१६ चे सुधारीत व २०१६-१७ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता विशेष सभा आयोजित होती.

Budget meeting for 10-minute delay is canceled | १० मिनिटांच्या विलंबासाठी बजेटची सभा केली रद्द

१० मिनिटांच्या विलंबासाठी बजेटची सभा केली रद्द

सदस्यांचे असहकार्य : जनजागृती रॅलीमुळे विलंब
पुलगाव : नगर परिषदेच्या २०१५-१६ चे सुधारीत व २०१६-१७ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता विशेष सभा आयोजित होती. या सभेसाठी न.प. अध्यक्ष व मुख्याधिकारी दहा मिनिटे विलंबाने पोहोचले. न.प. सदस्यांनी सहकार्य करणे गरजेचे होते; पण केवळ दहा मिनिटांसाठी सभाच रद्द करण्यात आली. यामुळे पालिकेचे बजेट सादर होऊ शकले नाही.
मंगळवारी (दि.२३) संत गाडगे महाराज जयंती असल्याने स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलनाबाबत शहरात जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी रॅलीत सहभागी होऊन जागृती केली. परिणामी, दोघेही विशेष सभेमध्ये नियोजित वेळेच्या केवळ दहा मिनिटे उशिरा उपस्थित झाले. अन्य नगरसेवकांनी सहकार्य करीत सभा सुरू करणे गरजेचे होते; पण तसे न करता सभाच रद्द करण्यात आली. अध्यक्ष व मुख्याधिकारी आले तेव्हा कुणीही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे बजेटसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकली नाही.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ८१ (६) नुसार कोणत्याही कारणास्तव सभेला अध्यक्ष उपस्थित नसल्यास त्यांच्या गैरहजेरीत पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कामकाज चालविणे शक्य होते. शिवाय अधिनियमाचे ८१ (९) नुसार सभा तहकुब करून त्यानंतर सभेचे कामकाज चालविणे शक्य होते; पण काही सदस्यांनी सभेतून निघून जाणे पसंत केले. बुधवारी आयोजित सर्वसाधारण सभेत मात्र गणपूर्ती होऊन कामकाज पूर्ण करण्यात आले. न.प. सदस्यांना शहराच्या विकास कामांत रस नसल्याचे नगराध्यक्ष साहु यांनी नमूद केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Budget meeting for 10-minute delay is canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.