‘ब्राऊन रॉट’मुळे अकराशे हेक्टरवर फळगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST2020-09-08T05:00:00+5:302020-09-08T05:00:34+5:30

जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आष्टी (शहीद), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यात संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. या तालुक्यांमध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीचे लागवड क्षेत्र आहेत. यावर्षी बागा चांगल्या आल्या असतानाच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अचानक ब्राऊन रॉट (तपकिरी रॉट) या रोगाने आक्रमण केले.

‘Brown rot’ results in eleven hundred hectares of fruit | ‘ब्राऊन रॉट’मुळे अकराशे हेक्टरवर फळगळ

‘ब्राऊन रॉट’मुळे अकराशे हेक्टरवर फळगळ

ठळक मुद्देफळ उत्पादकांचे नुकसान : आष्टी तालुक्याला सर्वाधिक फटका, नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या सावटाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता सततचा पाऊस आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन उत्पादकांची वाट लागली असतानाच आता संत्रा व मोसंबीवरही ‘ब्राऊन रॉट’ या रोगाने आक्रमण केल्याने जिल्ह्यातील १ हजार १८७.५० हेक्टरवरील फळगळ झाली आहे. त्यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाºया आर्वी, आष्टी (श.) व कारंजा (घा.) तालुक्यातील संत्रा उत्पादकांना पहिल्यांदाच जबर फटका बसला आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आष्टी (शहीद), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यात संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. या तालुक्यांमध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीचे लागवड क्षेत्र आहेत. यावर्षी बागा चांगल्या आल्या असतानाच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अचानक ब्राऊन रॉट (तपकिरी रॉट) या रोगाने आक्रमण केले. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील १४४ गावांमधील १ हजार १८७.५० हेक्टरवरील बागा उद्धवस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून जोपासलेल्या या बागांमधील फळे आता गळायला लागल्याने शेतकºयांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे. सोयाबीन पाठोपाठ आता संत्रा, मोसंबीही हातातून गेल्याने तात्काळ पंचनामे करुन उत्पादकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. दिवसेंदिवस रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर लवकर नियंत्रण मिळविण्याची गरज व्यक्त होत आहे. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही तर सकाळी पडणारे धुके किंवा दवबिंंदूमुळे या फळपिकास गंभीर धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

फळ उत्पादकांनी अशा कराव्या उपाययोजना
सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तसीच राहू देऊ नये, अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. वाफा स्वच्छ ठेवावा. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे, कारण जिकडे पाणी साठून राहते त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीची लागण अधिक होते.
फायटोफ्थोरा फळावरील तपकिरी रॉटमुळे होणाºया फळगळसाठी संपूर्ण झाडावर फोसिटिल+ए.एल २.५ ग्रॅम किवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ५० डब्ल.ूपी २.५ ग्रॅम किवा कॅप्टन ७५ डब्लू.पी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी किंवा २०० लिटर ड्रममध्ये जी.ए- २ ग्रॅम, कोरोफायरीफोस ५०० मिली, किटोशी ३००मिली, व्हॅलीडामायसिन ५००मिली व अमोनियम मॉलिब्डेनम २००ग्राम एकत्र करुन फवारणी करावी.

संत्रा व मोसंबी पिकावर कायटोप्थोरा बुरशी व तपकिरी रॉटचे संक्रमण एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच हवेतून पसरले आहे. संत्रा ४० टक्के तर मोसंबी गळ ९० टक्के झाली आहे. शासनाने हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी मंत्र्यांकडे केली आहे. संत्रा, मोसंबी यावर येणाºया रोगासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने संशोधन केंद्र देण्यात यावे. यासाठी पाठपुरावा शासनाकडे करणार आहे.
- श्रीधर ठाकरे, अध्यक्ष, महाआॅरेंज महाराष्ट्र राज्य मुंबई.

जिल्ह्यात ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात आली असून ‘ब्राऊन रॉट’ मुळे जवळपास १ हजार १८७.५० हेक्टरवरील बागांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरु असून शेतकºयांनाही उपायोजनासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असून शेतकºयांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Web Title: ‘Brown rot’ results in eleven hundred hectares of fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.