शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घरजावयानेच साळीला गर्भवती केले; आता २० वर्षे खडी फोडणार

By चैतन्य जोशी | Updated: January 24, 2024 20:39 IST

अतिरिक्त विशेष न्यायाधीशांचा निर्णय

वर्धा : अल्पवयीन साळीचे शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम जावई आरोपी गोविंदा बाबाराव येलेकर (२७, रा. रोहणा ता. आर्वी) यास २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावून ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा निर्वाळा अतिरिक्त विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी २४ रोजी दिला. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पीडितेच्या पुनर्वसनासाठी नुकसानभरपाई देण्याचे आदेशित केले.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी जावई गोविंदा येलेकर हा पीडितेच्या मोठ्या बहिणीचा पती आहे. आरोपी व पीडितेची मोठी बहीण हे पीडितेच्याच घरी राहत होते. पीडितेच्या मोठ्या बहिणीला एक सहा महिन्याची मुलगी होती. पीडिता जेव्हा एकटीच घरी असायची तेव्हा आरोपी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती तिचे शारीरिक शोषण करायचा. आरोपीने अल्पवयीन पीडितेचे अनेकदा शोषण केले. पीडितेच्या आई-वडिलांची प्रकृती ठीक राहत नसल्याने ते रोजमजुरीच्या कामाला न जाता घरी राहत होते. तेव्हा आरोपी त्यांच्यासोबत वाद करीत असायचा. वारंवार शोषण केल्याने पीडिता ही गर्भवती झाली. त्यावेळी तिचे वय १७ वर्षे होते. पीडिता अल्पवयीन असूनही ती गर्भवती असल्याचे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी पीडितेचे बयाण नोंदविले असता आपबीती सांगितली. पोलिसांनी आरोपी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेला बाळ झाले ते अशक्त असल्याने काही दिवसांनी ते दगावले. डीएनए अहवालानुसार पीडितेला झालेले बाळ आरोपीपासून झाल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणात पुलगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सोनाली राठेड यांनी केला. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. विनय आर.. घुडे यांनी कामकाज सांभाळून यशस्वी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी मदत केली. तसेच पैरवी सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली.

शासनातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, पीडितेची आई, वैद्यकीय अधिकारी, रासायनिक विश्लेषक नागपूर यांचा डीएनए अहवाल व इतर साक्षीदार यांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

टॅग्स :wardha-acवर्धा