कानगाव मार्गावरील पूल झाले दयनीय
By Admin | Updated: September 13, 2014 02:11 IST2014-09-13T02:11:09+5:302014-09-13T02:11:09+5:30
कानगावकडे जात असलेल्या मार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांनातोंड देत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे सर्वत्र प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केल जात आहे.

कानगाव मार्गावरील पूल झाले दयनीय
मोझरी (शेकापूर) : कानगावकडे जात असलेल्या मार्गावर वाहनधारकांना अनेक समस्यांनातोंड देत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे सर्वत्र प्रवाशांमध्ये रोष व्यक्त केल जात आहे.
मार्गावरील तीन पुलावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीधारकांचे किरकोळ अपघात आता नित्याचेच झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अल्पावधीत निर्माण झालेले पुलावरील खड्डे वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. परंतु याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. लोकप्रतिनीधी केवळ सभा, कार्यक्रम यातच व्यस्त असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आणखी संपात व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते, परिणामी खोलीचा अंदाज चुकतो आणि अपघाताला समोर जावे लागत आहे. मोझरी-कानगाव मार्गावरील तीनही पुलावर खड्डे पडले आहे. पुलाच्या मधोमध, कडेला भगदाड पडले आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. सोबतच काटेरी झुडूपामुळे मार्ग अरुंद होत आहे. त्यामुळे झुडूपे तोडून मार्गाचे दुपदरीकरणाची गरज व्यक्त होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणीही केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)