शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

लग्नात नववधू बहिणीला भावाने आंदणात दिली ‘गाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:35 IST

तालुक्यातील रेहकी येथील चेतन मनोहर घुमडे यांचा शुभ विवाह उमरेड येथील प्रियंका विठोबा बेले यांच्याशी रविवारी झाला. लग्नसमारंभात आलेल्या आप्तेष्टांनी वेगवेगळ्या भेटवस्तू वधूला आंदनात दिल्या; परंतु जुन्या परंपरागत चालिरितींला उजाळा देत मानलेल्या भावाने बहिणीला भेटस्वरुपात गाय दिल्याने ही अनोखी भेट सदर लग्न सोहळ्यात चर्चेचा विषय ठरली.

ठळक मुद्देसजवलेली गाय भेट दिल्याने जुन्या परंपरांना उजाळा : अनोखी भेट ठरली रेहकी गावासह लग्नसमारंभात चर्चेची

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील रेहकी येथील चेतन मनोहर घुमडे यांचा शुभ विवाह उमरेड येथील प्रियंका विठोबा बेले यांच्याशी रविवारी झाला. लग्नसमारंभात आलेल्या आप्तेष्टांनी वेगवेगळ्या भेटवस्तू वधूला आंदनात दिल्या; परंतु जुन्या परंपरागत चालिरितींला उजाळा देत मानलेल्या भावाने बहिणीला भेटस्वरुपात गाय दिल्याने ही अनोखी भेट सदर लग्न सोहळ्यात चर्चेचा विषय ठरली.विवाह सोहळ्यात वर-वधूला नातेवाईकांसह आप्तेष्ट अनेक स्वरुपाच्या भेटवस्तू देतात. त्यांचा संसार सुखाचा होवो अशीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते. परंतु त्या भेटवस्तूत भौतिक वस्तुंचाच समावेश असतो. मात्र याला अपवाद ठरले ते येथील उमरेड चेतन व प्रियंका यांचा विवाह सोहळा.. ! सदर लग्न सोहळ्यात प्रियंकाचा मानलेला भाऊ प्रकाश मुळे याने बहिणीला भेटस्वरुपात चक्क गाय आंदन दिली.प्रकाश मुळे यांचा दुधाचा व्यवसाय आहे. ते वधूपिता विठोबाजी बेले यांच्याकडे दररोज दूध पोहचविण्यासाठी यायचे. तेव्हा प्रियंका ही त्यांच्याकडून दूध घेताना त्यांना भाऊ म्हणून हाक मारायची. दोघांतही जिव्हाळ्याचे संबंध होते. सासरी बहिणीला दूध घेताना आपली आठवण यावी म्हणून प्रकाशने प्रियंकाच्या लग्नात चक्क गायच भेटस्वरुपात दिली. भेटस्वरुपात दिलेल्या गायीला झुल टाकून सजवीत प्रकाश मुळे यांच्याकडून प्रियंकाताईस सप्रेम भेट असे लिहिले होते. लग्नसमारंभात सजवलेली गाय आंदनात बघून वºहाडी मंडळींना आश्चर्याचा धक्काच बसला. वधूला आंदनात गाय मिळत आहे म्हणून हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी अनेकांनी तिथे गर्दी केली होती. जुन्या परंपरागत चालिरितींना उजाळा देत मानलेल्या भावाने बहिणीला भेटस्वरुपात दिलेली गाय वºहाडी मंडळींकरिता चचेर्चा विषय ठरला.आंदनात मिळालेली गाय घेऊन जेव्हा वरात गावात आली. तेव्हा रेहकी वासियांना सुद्धा ही भेटवस्तू पाहून आश्चर्यच झाले. हा प्रकार नव्या पिढीकरिता जरी आश्चर्याचा असला तरी पूर्वीच्या काळी लग्नसमारंभात अशाच प्रकारे भेटवस्तू मिळत असल्याच्या आठवणींना या निमित्ताने पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.