शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जलपर्णीमुळे कोंडलाय तलावाचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:48 IST

शहराकरिता जीवनदायिनी ठरलेल्या गाव तलावाला जलपर्णींसह झाडे-झुडुपांंनी वेढा दिला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यभरात शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करुन जलसंधारण व जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

ठळक मुद्देसमुद्रपूरच्या गाव तलावाचे अस्तित्वच धोक्यात : जीवनदायिनी ठरलेल्या तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : शहराकरिता जीवनदायिनी ठरलेल्या गाव तलावाला जलपर्णींसह झाडे-झुडुपांंनी वेढा दिला आहे. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. राज्यभरात शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करुन जलसंधारण व जलस्त्रोत बळकटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरुन स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित असतानाही नगरपंचायतीला मात्र तलावाच्या पुनर्जीवनाच्या कामाचा विसर पडल्याचा आरोप होत आहे.शहरातील बाजार समितीच्या मागच्या बाजूस असलेल्या या गाव तलावाची निर्मिती जवळपास पन्नास वर्षापूर्वी जनपत सभेच्या कालखंंडात झाली आहे. तब्बल दहा ते बारा एकर जागेत हा तलाव विस्तारलेला आहे. आठवडी बाजारात बैल व गुराच्या खरेदी-विक्रीकरिता येणाऱ्या बाजारकरु आणि गुरांची तहाण याच तलावातून भागविली जात होती. आता हाच गाव तलाव दुर्लक्षितपणाचा बळी पडत आहे. मागील तीन दशकापासून बेशरमच्या झुडपांनी वेढलेला आहे. तसेच या तलावाचा गाळही उपसला नसल्याने तो पुर्णत: बुजलेला आहे. तसेच तलाव्या पाळी जमीनदोस्त झाल्याने या तलावाचे सौदर्यही धोक्यात आले असून हा तलाव शहरासाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. तलावाचे महत्व लक्षात घेऊन मागील अनेक वर्षापासून या तलावाला पुनर्जीवीत करण्याचे प्रस्ताव प्रशासन दरबारी घेण्यात आले. मात्र गेल्या पन्नास वर्षाच्या काळात एकदाही या तलावाची स्वच्छता करुन गाळ उपसण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. या तलावात ३० वर्षापूर्वी मत्स्य व्यवसाय करून भोयी समाज स्वत: चा उदरनिर्वाह करीत होते.पण, या वीस वर्षाच्या काळात या तलावात पाण्याचा थेंबही दिसत नाही. यामुळे गावातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पूर्वी गावातील महिला या तलावाच्या पाण्याचा वापर कपडे धुण्याकरिता करीत होत्या. तलावात पाणी साचत असल्याने गावातील घरगुती आणि सार्वजनिक विहिरींची पाण्याची पातळी टिकून राहत होती.पण मागील काही वर्षात गावातील विहिरींनी तळ गाठले आहे. तलावात गाळ साचून झाडे-झुडुपांनीही वेढा दिल्याने या तलावाचा श्वास कोंडला आहे. या तलावात पाणी साठविले जात नसल्याने गावातील पाण्याची पातळी खालावत आहे. गावातील सामाजिक कार्य करणाºया मंडळींनी बरेचदा या तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी ग्रामप्रशासनाकडे मागणी केली आहे. परतु ती मागणीही ग्रामप्रशासनाच्या दप्तरी कित्येक वर्षापासून खितपत पडलेली आहे. गावासाठी महत्वाचा असलेल्या तलावाचे खोलीकरण व स्व्च्छता केली तर गावातील पाण्याची पातळी वाढून गावातील पाण्याचा प्रश्न सुटेल व काहींना रोजगारही मिळेल.राजकीय कलहामुळे आलेला निधी गेला परतमागील २ वर्षापूर्वी ग्रामपंचायतीकडे तलावाच्या सौदर्यीकरणाकरिता निधी उपलब्ध झाला होता.पण राजकीय कलहामुळे हा निधी परत गेला. त्यामुळे या तलावाचा श्वास कोंडलेलाच आहे. नगरपंचायतीत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने या तलावाच्या पुनर्जीवितेसाठी पदाधिकाºयांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. गावातील सामाजिक कार्यकर्त्याकडून तलावाचा गाळ काढून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.तलाव पुनर्जिवीत करण्याचे काम नगर पंचायतीच्यावतीने प्रस्तापित आहे. मात्र या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. या संदर्भात आमदार समीर कुणावार यांनी पाठपुरावा केला आहे.निधी मिळण्याची संभावना आहे.सदर कामासाठी २ कोटी निधीची गरज आहे. अनुलोम सामाजिक संस्थेच्या वतीने तलावाचे खोलिकरण व गाळ उपसण्याचे काम प्रस्तावित काम आहे.- स्वालिहा मालगावे, प्रशासकीय अधिकारी, नगर पंचायत, समुद्रपूर.गाव तलाव खोलिकरणाचा मुद्दा सभागृहात कित्येकदा मांडला. सत्ताधाºयांनी गांभीर्याने घेतले नाही .त्यामुळे ‘गाळमुक्त तळ व शिवारयुक्त तळ’ या कार्यक्रमा अंतर्गत अनुलोम संस्थेच्या पदाधिकाºयांना भेटून योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. सदर काम प्रस्तावित आहे.- आशिष अंड्रस्कर, नगरसेवक.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण