शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना ब्रेक; 216 ज्येष्ठांसमोर अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

गरीब व गरजूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय उपयुक्तच ठरणारे आहे; परंतु कोविड संकटामुळे या रुग्णालयातील इतर सेवांकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. कायमस्वरूपी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना कोविड संसर्ग झाल्यापासून जिल्हा शल्यचिकित्सक उंटावरून शेळ्या हाकत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याची ओरड सध्या होत आहे. एरवी प्रत्येक महिन्याला डोळ्याच्या १२ ते १५ शस्त्रक्रिया या रुग्णालयात व्हायच्या; परंतु सध्या तब्बल २१६ गरजू नेत्र शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. 

ठळक मुद्देकोरोना संकटाचा काळ : जिल्हा सामान्य रुग्णालयातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या अडचणीत भर पडली आहे. कोविडबाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जात असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात होणाऱ्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियांवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सद्य:स्थितीत तब्बल २१६ ज्येष्ठ नागरिक डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची प्रतीक्षा करीत आहेत.गरीब व गरजूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय उपयुक्तच ठरणारे आहे; परंतु कोविड संकटामुळे या रुग्णालयातील इतर सेवांकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. कायमस्वरूपी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना कोविड संसर्ग झाल्यापासून जिल्हा शल्यचिकित्सक उंटावरून शेळ्या हाकत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याची ओरड सध्या होत आहे. एरवी प्रत्येक महिन्याला डोळ्याच्या १२ ते १५ शस्त्रक्रिया या रुग्णालयात व्हायच्या; परंतु सध्या तब्बल २१६ गरजू नेत्र शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. 

जिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय या रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात थोड्या-अधिक प्रमाणात सध्या कोविडबाधितांवर उपचार होत आहेत. नेत्र विभागात २० खाटांची क्षमता आहे; परंतु तो विभाग कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आला आहे. त्यामुळे नेत्र शस्त्रक्रियांना सध्या ब्रेक लागल्याचे वास्तव आहे. असे असले तरी प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सध्या प्रयत्न होत आहेत.- डॉ. किरण मडावी, प्रमुख, नेत्र विभाग, सा. रु., वर्धा. 

अंधार कधी दूर होणार?

नेत्र शस्त्रक्रियेसाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात रीतसर  प्रक्रिया केली; परंतु वेळीच शस्त्रक्रियेसाठी निरोप आला नाही. अशातच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाची गाडी गावात आली होती. त्यामुळे आपण सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात एक महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया केली.- उमा कांबळे, शेगाव (कुंड).

 

जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची इच्छा दर्शवीत त्याबाबत माहिती जाणून घेतली; पण कोविडमुळे शस्त्रक्रिया होणार नाही, असे सांगण्यात आल्याने वर्धा शहरातील खासगी रुग्णालयात आपण शस्त्रक्रिया केली आहे.- अरुण राऊत, बोरगाव. 

नेत्र शस्त्रक्रियेसाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंदणी केली आहे; परंतु अद्यापही रुग्णालयाकडून शस्त्रक्रियेसाठी अपॉइंटमेंट देण्यात आलेली नाही. रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नेत्र विभागात शत्रक्रिया सुरू केल्या पाहिजेत.- वसंत सातघरे, करंजी (काजी).

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या