शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाखा अभियंत्याकडून प्रेयसीस मारहाण, जिल्हा परिषदेतील प्रकार

By आनंद इंगोले | Updated: July 18, 2023 18:15 IST

पोलिसांत गेले प्रकरण, गुन्हा दाखल

वर्धा : शाखा अभियंता प्रेयसीला टाळायला लागल्याने प्रेयसीने संपर्क साधून थेट जिल्हा परिषद गाठली. या ठिकाणी प्रियकर शाखा अभियंता याची भेट घेतली असता त्याने तिला मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी प्रेयसीने पोलिसांत तक्रार दाखल केली असता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषदच्या आवारात घडली.

प्रेयसी महिला ही विवाहित असून ती आठवर्षापूर्वी पतीपासून विभक्त झाली. तिचे आर्वी हे माहेर असल्याने तिचे आर्वीत जाणे-येणे होते. याच दरम्यान आर्वीत शाखा अभियंता असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांच्याही भेटी गाठी सुरु झाल्या. असे बरेच दिवस चालल्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून प्रियकर प्रेयसीला टाळायला लागला. बरेचदा फोन केल्यानंतरही प्रतिसाद देत नव्हता. अखेर १७ जुलैला प्रेयसीने सायंकाळी साडेपाच वाजतादरम्यान शाखा अभियंत्यास फोन केला असता त्याने जिल्हा परिषद, वर्धा येथे असल्याचे सांगितले. त्यामुळे भेट घेण्याकरिता प्रेयसी तडक जिल्हा परिषदेत आली. परंतु प्रियकर काही वेळानंतर जिल्हा परिषदेत पोहोचला.

दोघांचीही भेट झाल्याबरोबर प्रियकराने मारहाण सुरु केली असता त्याच्या हातातील कडे प्रियसीच्या डोक्यावर लागून रक्त निघायला लागल्याचे महिलनेते तक्रारीत म्हटले. हे प्रकरण पोलिसात पोहोचताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाद सोडविला. पे्रयसीने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर प्रियकर शाखा अभियंता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीzpजिल्हा परिषदwardha-acवर्धा