पीक प्रशिक्षण मेळाव्यात विविध विषयांवर मंथन

By Admin | Updated: February 27, 2016 02:25 IST2016-02-27T02:25:20+5:302016-02-27T02:25:20+5:30

राष्ट्रीय गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत भुईमूग पीक प्रशिक्षण व शेतकरी मेळावा पवनार येथे घेण्यात आला. मेळाव्यात शेती क्षेत्रातील विविध विषयांवर मंथन करण्यात आले.

Brainstorm on various topics in the Peak Training Meet | पीक प्रशिक्षण मेळाव्यात विविध विषयांवर मंथन

पीक प्रशिक्षण मेळाव्यात विविध विषयांवर मंथन

राष्ट्रीय गळीत धान्य विकास कार्यक्रम
पवनार : राष्ट्रीय गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत भुईमूग पीक प्रशिक्षण व शेतकरी मेळावा पवनार येथे घेण्यात आला. मेळाव्यात शेती क्षेत्रातील विविध विषयांवर मंथन करण्यात आले. खरीप, रबी व उन्हाळी अशी तीनही पिके ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे त्यांनी घ्यावी या उद्देशाने सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कृषी कीर्तनकार डॉ. पेशकर, तालुका कृषी अधिकारी विपिन राठोड आदींची उपस्थिती होती. आमदार डॉ. भोयर म्हणाले, शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. ही भूमिका राज्य शासनाच्या कृषी विभागाने पार पाडणे गरजेचे आहे, कृषी विभागाने शेतकऱ्याला धीर द्यावा. शासनाच्या संपूर्ण योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचाव्या. पण शेतकऱ्यांनीही अहोरात्र मेहनत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जलशिवार योजना, पांदण रस्ते, यासारख्या योजना शासन राबवित असून मागेल त्याला सोलर पंप देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी कीर्तनकार डॉ. पेशकर यांनीही शेतकरी अज्ञानापासून दूर कसा होईल, यावर मार्गदर्शन केले. शेतकरी हा कृषी केंद्रचालक जे देतात त्याचाच वापर करतो. त्यामुळे पिकाच्या लागवडीकरिता प्रशिक्षण शिबिराचे नियमित आयोजन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी दिली. बचत गटामार्फत देण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी विपिन राठोड यांनी दिली. बचत गटाच्या माध्यमातून सामुहिक शेती केल्यास पिकांचे योग्य नियोजन होईल आणि आपण दर्जेदार उत्पन्न घेऊ शकलो तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहचू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण शिबिराला उपविभागीय कृषी अधिकारी उल्हास नाडे, पं. स. सदस्य पुरुषोत्तम टोणपे, सिमये, वाघमारे, सरपंच, अजय गांडोळे, गोमासे, अशोक भट व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. श्रीकांत तोटे यांच्या शेतात सदर मेळाव्याचे आयोजन कृषी सहायक प्रशांत भोयर यांनी केले होते. संचालन कृषी सहायक रंजना वानखेडे यांनी केले. आभार प्रशांत भोयर यांनी सर्वांचे आभार मानले.(वार्ताहर)

Web Title: Brainstorm on various topics in the Peak Training Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.