चर्चासत्रात मृदा आरोग्यावर मंथन

By Admin | Updated: December 11, 2015 02:53 IST2015-12-11T02:53:19+5:302015-12-11T02:53:19+5:30

कृषी विज्ञान केंद्र, वर्धा तसेच कृषी विभाग, वर्धा आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी येथील नगर भवनात शेतकऱ्यांच्या उपस्थित चर्चासत्र पार पडले.

Brainstorm on soil health in the seminar | चर्चासत्रात मृदा आरोग्यावर मंथन

चर्चासत्रात मृदा आरोग्यावर मंथन

नवतंत्रज्ञानावर भर : मृदा संवर्धनाचे धडे
वर्धा : कृषी विज्ञान केंद्र, वर्धा तसेच कृषी विभाग, वर्धा आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी येथील नगर भवनात शेतकऱ्यांच्या उपस्थित चर्चासत्र पार पडले. यात मृदा संवर्धनावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सभापती श्यामलता अग्रवाल होत्या तर उद्घाटक नगराध्यक्ष शोभा तडस होत्या. अतिथी म्हणून प्रशांत तिंगावकर, नगरपरिषद उपाध्यक्ष विजय गोमासे, आदमने, कुरडकर, लाभे यांची उपस्थिती होती.
या मातीतून मानवाने आजवर असधारण गरजा भागविल्या. परंतु या गरजा भागविताना मातीचे आरोग्य जपण्याची जबाबदारीचा आपल्याला विसर पडला. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घेत पोषक घटकांची आवश्यकतेनुसार पूर्तता करीत विकसीत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मृदा संवर्धन शक्य आहे, असे मत समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे यांनी यावेळी व्यक्त केले.
मार्गदर्शक म्हणून मृदाविज्ञान व रसायनशास्त्र विभाग व कृषी महाविद्यालय, नागपूर चे आर.एम. घोडपाणे, जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी रश्मी जोशी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक दीपक पटेल, पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. प्रदीप दवने, तालुका कृषी अधिकारी जे.एस. ब्राम्हणे, विषयतज्ज्ञ प्रा.उज्वला सिरसाट, गटतंत्र व्यवस्थापक निरंजन वराडे यांचा सहभाग होता.
पहिल्या सत्रात ईसापूर येथील दुग्ध उत्पादक शेतकरी नरेश ढोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात रश्मी जोशी यांनी माती परिक्षण आणि खत व्यवस्थापनाविषयी तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रवीण भुजाडे, मस्कर, संदीप कांबळे, कर्मचारी वृंद, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा येथील गटतंत्र अधिकारी व सहकारी, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी सहकार्य केले. आभार वराडे यांनी मानले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Brainstorm on soil health in the seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.