शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

बोरनदीचा गाळ उपसून ‘समृद्धी’ला देणार बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:42 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या महामार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या महामार्गावर बोरनदीचे पात्र उपसून त्यातील साहित्य वापरण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावर शासनस्तरावर विचार सुरू आहे.

ठळक मुद्देशासनस्तरावर प्रस्ताव विचाराधीन : जलसंचय वाढून शेतकऱ्यांना मिळणार लाभ

अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या महामार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या महामार्गावर बोरनदीचे पात्र उपसून त्यातील साहित्य वापरण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावर शासनस्तरावर विचार सुरू आहे. बोर नदीचे पात्र उपसून त्यातील गाळ, रेती, आदींचा वापर महामार्गाच्या कामासाठी केल्यास बोर नदीपात्रात जलसंचय वाढून या भागातील शेतकऱ्यांसाठी जलक्रांती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.नागपूर जिल्ह्यातून उगम असलेल्या बोरनदीवर बोरी येथे धरण बांधण्यात आले आहे. सेलू, वर्धा व हिंगणघाट या तीन तालुक्यातून ही नदी जाते. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ व विविध जातीच्या वनस्पती वाढून पात्र अतिशय अरुंद झाले आहे. त्यामुळे रस्ता कामासाठी लागणारे गौण खनिज नदीपात्र उपसून त्यातून घेण्यात यावे, अशी मागणी या भागाचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांच्याकडे केली होती.त्यानंतर या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावरून वेग देण्यात आला. पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारित नदी व धरण येत असल्याने याबाबत रस्ते विकास महामंडळालाही पाटबंधारे विभागाने पत्र पाठविले आहे. तसेच खनिकर्म विभागाला रस्ते विकास महामंडळाने नदी उपसा करून रेती, मुरूम, माती उचल करण्याबाबत परवानगी मागितली आहे.या कामाला परवानगी मिळाल्यास समृद्धी महामार्गासाठी बोर नदीतीलच वाळू, मुरूम, गाळ उपलब्ध होईल. त्यामुळे नदीची स्वच्छता होऊन संपूर्ण नदीचे पात्र खोलीकरण केले जाईल. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.बुलडाणा, अकोला जिल्ह्यात झाला असा प्रयोगकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने बुलढाणा, अकोला जिल्ह्यात अनेक रस्त्यांचे बांधकाम केले. या कामासाठी त्या भागातील नदी पात्रातूनच वाळू, गाळ, आणि मुरूम उपसा करून तो रस्ता बांधकामासाठी वापरला. त्यामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला. जवळपास २० ते २५ गावे टँकरमुक्त झालीत, अशी माहिती आहे.कंत्राटदाराला अडचणबोर नदीपात्र उपसून त्यातील वाळू, मुरूम, माती रस्ता कामासाठी वापरण्यास शासकीयस्तरावर विचार सुरू आहे. मात्र, समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा वाहतुकीसाठी खर्च वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबत किती सकारात्मक प्रतिसाद मिळतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरणriverनदी