गिरड टेकडीवरील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत

By Admin | Updated: July 12, 2015 02:20 IST2015-07-12T02:20:54+5:302015-07-12T02:20:54+5:30

येथील शेख फरिदबाबा दर्गाह टेकडीवरील सुरक्षा रक्षकांना शितपेयामध्ये गुंगीचे औषध देवून दानपेटी फोडल्याची घटना ५ जुलैच्या रात्री घडली होती.

Both of them were found hanging in the granite hill | गिरड टेकडीवरील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत

गिरड टेकडीवरील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत


गिरड : येथील शेख फरिदबाबा दर्गाह टेकडीवरील सुरक्षा रक्षकांना शितपेयामध्ये गुंगीचे औषध देवून दानपेटी फोडल्याची घटना ५ जुलैच्या रात्री घडली होती. याप्रकरणी गिरड पोलिसांनी दोन आरोपींना शुक्रवारी रात्री नागपूर येथून ताब्यातंं घेतले आहे. त्यांचा एक सहकारी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
संजय दमडू धरबेहरा (२५) रा. ओडिशा आणि रोहित ऊर्फ सुनील कोणुलाल पंतेश्वर (२६) रा. छत्तीसगड दोघांचाही ह.मु. रामकृष्णनगर, नागपूर अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत.
या घटनेत चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज लंपास केला होता. तसेच दर्गाहमधील सीसी टिव्ही कॅमेरे आणि सेट टॉप बॉक्सही पळविला होता. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या वर्णनावरून यातील संशयित आरोपींचे स्केच बनविण्यात आले होते. सदर आरोपी नागपूर येथील रामकृष्ण नगरमध्ये असल्याची माहिती गिरड पोलिसांना मिळाली. तत्पूर्वी यातील एका आरोपीच्या बहिणीची माहिती मिळाली. तिचे घर गाठत माहिती विचारली असता सदर आरोपी हे ताजबाग मार्गावरील रामकृष्णनगरमध्ये राहत असल्याचे उघड झाले. येथून पोलिसांनी संजय आणि सुनीलला ताब्यात घेतले. दोघांनाही गिरड येथील टेकडीवर आणत सुरक्षा रक्षकांकडून ओळख पटविण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी हेच लुटारू असल्याचे सांगितले. शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि.१३) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर कारवाई एसडीपीओ वासुदेव सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर, दादा शंभरकर, शरद इंगोले, धनराज सयाम आदींनी केली.(वार्ताहर)

Web Title: Both of them were found hanging in the granite hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.