डॉक्टरसह दोघे गंभीर

By Admin | Updated: November 20, 2014 22:56 IST2014-11-20T22:56:00+5:302014-11-20T22:56:00+5:30

वर्धा मार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या टी-पॉर्इंटवर सहा चाकी टिप्परने कारला जबर धडक दिली. या धडकेत कारमधील दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सावंगी रुगालयात नेण्यात आले.

Both doctors with serious | डॉक्टरसह दोघे गंभीर

डॉक्टरसह दोघे गंभीर

एमआयडीसी वसाहतीनजीक टिप्परची कारला जबर धडक
देवळी : वर्धा मार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या टी-पॉर्इंटवर सहा चाकी टिप्परने कारला जबर धडक दिली. या धडकेत कारमधील दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सावंगी रुगालयात नेण्यात आले. हा अपघात गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला.
पोलीस सुत्रानुसार, नागपूर कमाल चौक येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. गोपाल सुरेंद्र अरोरा (६०) हे स्वत:च्या कार क्रमांक एमएच ३१ ईए ६२५१ ने यवतमाळकडे जात होते. साप्ताहिक क्लिनिक असल्यामुळे त्यांना सकाळी ७.३० वाजेपर्यंत यतवमाळ येथे पोहचायचे होते. दरम्यान देवळी औद्योगिक वसाहतीकडून वर्धा मार्गावर भरधाव येत असलेल्या सहा चाकी टिप्पर एमएच ३२ क्यू १२३१ ने त्यांच्या कारला जबर धडक दिली. यात कार चालक धुलचंद तिवारी रा. नागपूर यांच्या पोटाला व छातीला जबर दुखापत झाली. डॉ. अरोरा सुद्धा जखमी झाले. या दोघांनाही सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धडक एवढी जबर होती की यात कार टिप्परच्या मधोमध जावून फसली. यामुळे कारमधील जखमींना बराच वेळ काढणे शक्य झाले नाही. पोलीस व रुग्णवाहिका आल्यानंतर जखमींना बाहरे काढण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा टिप्पर वर्धा येथील विशाल मानकर यांचा असून चालक जगदेव बिसन इंगळे (४५) रा. येळाकेळी याला अटक करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Both doctors with serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.