शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महामार्गामुळे बोर नदीपात्र होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:44 IST

जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे.

ठळक मुद्देशासनस्तरावर हालचालींना वेग : तीन तालुक्यांना लाभ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. या प्रकल्पालगत असलेली बोर नदीही कित्येक दिवसांपासून स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आता समृद्धी महामार्गाच्या सोबतीने या नदीपात्रालाही समृद्ध करण्यासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत शासनस्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्यामुळे लवकरच या नदीचे रूपडे पालटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तीन तालुक्यांतून महाराष्ट्र समृद्धी महामार्ग गेल्याने ७७३ शेतकरी गडगंज झाले आहेत. यापैकी ७३५ शेतकऱ्यांना ३५० कोटी ४२ लाख १७ हजार ७९५ रुपयांचा मोबदला मिळाला आहे. याकरिता या तिन्ही तालुक्यांतून ४९८.८१ हेक्टर शेती संपादित करण्यात आली आहे. या परिसरातील शेतींना चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे दिवस पालटले आहे. शेतकºयांनी शेतीचा पैसा शेतीतच गुंतवल्याचे दिसून येत आहे. आता सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाकरिता महत्त्वाची ठरणाºया तसेच १६ हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या बोरनदीचाही कायापालट करणे आवश्यक आहे. या नदीपात्राची अद्याप स्वच्छता झाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि जलपर्णींनी वेढा घातला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासाठी या नदीपात्रातील गाळ वापरण्यात यावा, जेणेकरून नदीचेही पात्र खोल आणि स्वच्छ होईल, या उद्देशाने स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हाधिकाºयांना पत्र दिल्यानंतर त्यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे विभागाकडे अहवाल मागितला होता. या दोन्ही विभागाने गाळ काढण्याकरिता सहमती दर्शविली असून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग